•चार चोरटे पोलीसांचा ताब्यात.
अजय कंडेवार,वणी: पोलीस ठाणे वणी हद्दीत दि. १९ जाने रोजी विलास दत्तुजी देउळकर वय ५० वर्षे, रा. वांजरी ह.मु. वणी यांचे ग्राम कळमना खर्दु शिवारातील शेतात असलेल्या टिनाचे बंड्यामध्ये ठेवुन असलेल्या शेतमालाची त्यांनी सायंकाळी ०४/०० वाजताचे सुमारास पाहाणी केली असता बंडयात ठेवुन असलेले सोयाबीन धान्यामधुन १५ क्विटल सोयाबिन किमंत ६४,५०० रु चे चोरी गेले असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दिनांक २० जाने रोजी पो.स्टे. वणी येथे दिलेल्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द ३७९ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

शेतमाल चोरी संबधाने गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक सो. यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणने करीता पथक रवाना करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यावरुन स्था.गु.शा. कडील पचक वणी येथे गुन्हा उघडकीस आणन्याचे दृष्टीने गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हेगारांचा मागोवा घेत असतांना गुन्हयाचे फिर्यादी विलास दत्तुजी देउळकर यांचे शेतातील सालकरी अनिल चव्हाण रा. वांजरी यानेच शेतातील सोयाबीन चोरले असल्याची गोपणीय माहिती प्राप्त झाली वरुन लागलीच ग्राम वांजरी येथे जावुन फिर्यादी यांचे शेतातील सालकरी अनिल नामदेव चव्हाण वय ५० वर्षे, रा. बेघर वांजरी यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कोशल्यपुर्वक तपास केला असता त्याने चार ते पाच दिवसांपूर्वी त्याचे गावातील जयश देउळकर, रोशन देउळकर, व अतुल ढवस यांचे मदतीने विलास दत्तुजी देउळकर यांचे शेतातील बंडयामुधुन अंदाजे २९ कट्टे सोयाबीन चोरले असल्याची व ते सोयाबीन त्याचे तिन साथीदारांनी मोटर सायकलवरुन नेवुन वणी येथे विकले असल्याची कबुली दिली. वरुन नमुद आरोपी १) अनिल नामदेव चव्हाण वय ५० वर्षे, रा. बेघर वांजरी व त्याचे साथीदार, २) रोशन तुळशीराम देउळकर वय ३० वर्षे, ३) जयेश शंकर देउळकर वय २० वर्षे, ४) अतुल उर्फ विवेक अवधुत धवस वय २९ वर्षे, सर्व रा. वांजरी यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे सोयाबीन मालाबाबत विचारपुस करुन केलेल्या तपासात त्यांनी चोरी केलेले सोयाबिन वणी येथील १) विजय गुलाबराव निते वय ४८ वर्षे व २) चंद्रशेखर पांडुरंग देठे वय ३९ वर्षे, दोन्ही रा. चिखलगांव वणी या वेगवेगळ्या दुकानदारांना विक्री केले असल्याचे दिसुन आल्याने नमुद दुकानदार यांचेकडुन अनुक्रमे १९ व १० असे २९ कट्टे अंदाजे १५ क्विटल सोयाबीन किंमत ६४,५००/ रु थे जप्त करुन आरोपीतांनी गुन्हयात वापरलेल्या ०२ मोटर सायकल किमंत ७०,०००/ रु असा एकुण १,३४,५०० रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी १) अनिल नामदेव चव्हाण वय ५० वर्षे, रा. बेघर वांजरी व त्याचे साथीदार, २) रोशन तुळशीराम देउळकर वय ३० वर्षे, ३) जयेश शंकर देउळकर वय २० वर्षे, ४) अतुल उर्फ विवेक अवधुत धवस वय २९ वर्षे, सर्व रा. वांजरी यांना पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. वणी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, योगेश डगवार, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी,नरेश राउत व सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे

