Ajay Kandewar,Wani:- राष्ट्रीय संरक्षण कामगार संघ ( इंटक INTUC) या संघटनेने वणी मतदारसंघातील महाविकास आघाडीतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रीय संरक्षण कामगार संघ यांनी एका पत्राद्वारे हा पाठिंबा व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांचं राजकीय व सामाजिक वलय बघता त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा कल वाढू लागला आहे. घटक पक्ष तथा सामाजिक व राजकीय संघटना त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवू लागल्या आहेत त्यातच राष्ट्रीय संरक्षण कामगार संघाने१४ नोव्हेंबरला दर्शविला आहे.त्यांना मिळालेल्या उमेदवारीने प्रभावित होऊन हा वर्ग आता त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवू लागला आहे.