Thursday, March 5, 2026
HomeBreakingअवैध धंद्यांना राजाश्रय की प्रशासनाची मूकसंमती?

अवैध धंद्यांना राजाश्रय की प्रशासनाची मूकसंमती?

Ajay Kandewar,Wani:- वणीपासून जवळ असलेल्या झरी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला असून, कायदा- सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मटका पणावळ,अवैध दारू विक्री, अनधिकृत प्रवासी वाहतूक, वाळू व कोळसा तस्करी, कोंबडे बाजार असे काळे व्यवसाय दिवसा-रात्री उघडपणे सुरू असतानाही त्यावर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. “कायद्याचा धाक संपला की जाणूनबुजून दुर्लक्ष की कुलदीपक चा वसुलीमुळे? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.

मुकूटबन चा काहीं शेतांमध्ये मटका सुरू आहे, बाजारपेठेत अवैध दारू सहज उपलब्ध आहे, तर रस्त्यांवर नियम धाब्यावर बसवून अनधिकृत वाहने धावत आहेत. नदीकाठावर वाळू उपसा आणि कोळसा तस्करीला जणू मोकळे रान मिळाले आहे. सामान्य माणसावर किरकोळ कारणांसाठी दंड ठोठावला जातो, मात्र मोठ्या वसुलीच्या धंद्यांकडे जाणूनबुजून डोळेझाक केली जाते, असा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. दिखाव्याच्या कारवाया होतात, पण दुसऱ्याच दिवशी सर्व काही पूर्ववत होते, यामागे “मोठे नाव” असल्याची चर्चा रंगली आहे.

मुकुटबन पोलीस स्टेशनची भूमिका संशयास्पद ठरत असतानाच जिल्हा पोलिस प्रशासनाचे मौनही अनेक प्रश्न निर्माण करत आहे. गेल्या काही महिन्यांत झालेल्या कारवाया केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप असून, ठोस निकाल शून्य आहे. त्यामुळे आता “वसुलीबाज कुलदीपक कोण?” हा प्रश्न जोर धरू लागला आहे. नागरिक संघटनांनी तातडीने स्वतंत्र चौकशी व संगनमत आढळल्यास कठोर कारवाईची मौखिक मागणी केली असून अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

“वसुलीबाज कुलदीपक कोण?”त्यामागे कोणाचे संरक्षण?”

कुलदीपक कथितपणे जुगार, झेंडीमुंडी, चंगळसदृश अवैध व्यवहारांतून वसुली गोळा करतो आणि त्याला अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे ही सर्व चर्चा मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत रंगत असल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.मोठ्यांवर मौन जनतेत तीव्र नाराजी असून, “वसुलीबाज कुलदीपक नेमका कोण”? त्यामागे कोणाचे संरक्षण?.असे थेट प्रश्न विचारले जात आहेत

 

क्रमशः ……….

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page