Thursday, April 16, 2026
HomeBreakingमुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत ‘कुल दीपक’ वसुलीचा Right Hand....

मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत ‘कुल दीपक’ वसुलीचा Right Hand….

Ajay Kandewar :- मुकुटबन परिसरातील नागरिकांमध्ये सध्या एकच खमंग चर्चा रंगली आहे. मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत कायद्याला हरताळ फासून झेंडीमुंडी, चंगळ, मटका-सट्टा व जुगाराचे खुलेआम सत्र सुरू असल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून केले जात आहेत. विशेष म्हणजे, या अवैध धंद्यांवर होणारी कारवाई थातूरमातूर स्वरूपाची असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुकुटबन पोलिस स्टेशन हद्द जणू अवैध धंद्यांचा ‘उद्धम बाजार’ बनली आहे. झेंडीमुंडी-चंगळाचे अड्डे निर्धास्तपणे सुरू असून, याचा थेट फटका तरुण पिढीला बसत आहे. व्यसनाच्या गर्तेत अडकलेली तरुणाई आणि उद्ध्वस्त होणारे संसार हे चित्र आता सर्वसामान्य झाले आहे. परिणामी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या संपूर्ण प्रकरणात आणखी खळबळजनक बाब म्हणजे, “कुल दीपक” नावाचा व्यक्ती कथितपणे अवैध वसुलीचा “Right Hand” म्हणून सक्रिय असल्याची जोरदार चर्चा आहे. नागरिकांमध्ये बोलले जात आहे की, मोठ्या प्रमाणावर वसुली करून ही रक्कम पुन्हा नव्या अवैध धंद्यांत गुंतवली जात आहे, ज्यामुळे हे जाळे अधिक मजबूत होत आहे. त्यामुळे “कुल दीपक” हे नावच परिसरात दहशतीचे पर्यायवाची बनत असून, गावात खुली बोंब आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

“हे सर्व प्रकारमुकुटबन पोलिसांच्या नजरेआड कसे सुरू आहेत?”“या अवैध धंद्यांना कोणाचा वरदहस्त आहे?”नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की, कुल दीपक याच्यावर केंद्रित राहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने सखोल, निष्पक्ष चौकशी करावी. कथित अवैध वसुली, आर्थिक व्यवहार, आणि त्यातून पोसल्या जाणाऱ्या धंद्यांचा पुरावा-आधारित तपास होऊन कायदेशीर कठोर कारवाई झालीच पाहिजे. केवळ किरकोळ कारवायांनी प्रश्न सुटणार नाही; मुख्य सूत्रधारांवर घाव घालणे अत्यावश्यक आहे.

नवीन ठाणेदारावर सर्वांचे लक्ष…..

नव्याने रुजू झालेले ठाणेदार P.I जाधव आणि DYSP सुरेश दळवे हे या प्रकरणाची दखल घेतील का? की यवतमाळ पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचेकडे पाठपुराव्याने “कुल दीपक” ला धडा शिकवाव लागेल अशी चर्चा गावात सुरू आहे, विशेष त्या कुलदीपकचे” झेंडीमुंडी-चंगळाचे अड्डे जाळे उध्वस्त करून “खात्यातील बदनामी थांबवावी आणि अशी जोरदार मौखिक मागणी सुद्धा नागरिकांकडून केला जात आहे.

 

“कुल दीपक ” चे कारनामे पुढील भागात….. क्रमशः 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page