Ajay Wani : सुशगंगा तंत्रनिकेतन, वणी येथे १७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये महाविद्यालयातील ८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये विविध नामांकित कंपन्यांनी घेतलेल्या निवड प्रक्रियेत तब्बल २३ विद्यार्थ्यांची निवड झाली. या यशामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यापूर्वीच नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळाली आहे.
कंपनीनिहाय निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये हायली इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस लिमिटेड, अहमदाबाद येथे अमर बोथाडे व विकेंद्र वैद्य यांची निवड झाली. एमआरएफ टायर्स, हैदराबाद येथे अमोझ बेग, अमान शेख, जिशान खान व गौरव मालेकर यांची निवड झाली. टाटा मोटर्स, चिखली, पुणे येथे कशाफ पठाण, संजीविनी राजूरकर, साहिल शेंडे, कृष्णा खरवांशी, प्रथमेश मार्तवार, अमिषा सिंग, प्रणय डाखरे व वेदांत मट्टे यांची निवड झाली. तर अपोलो टायर्स, बडोदा येथे वैष्णवी जैस्वाल, अनिर्बान गोस्वामी, प्रद्न्या डाखरे, वैजयंती तुराणकर, हर्षल चुनारकर, आसिफ शेख, प्रज्वल वाघाडे, अथर्व टाटेवार व पवन आघम यांची निवड झाली.
या यशाबद्दल सुशगंगा तंत्रनिकेतनच्या वतीने सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या यशस्वी आयोजनासाठी आमधानई प्रायव्हेट लिमिटेडचे मनुष्यबळ विभागाचे अधिकारी गौरव व्यास यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोंगिरवार, उपाध्यक्ष शमोहन बोंगिरवार, प्राचार्या पुष्पा राणी, प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी चैतन्य तुर्विले तसेच प्रशिक्षण व नियुक्ती विभागाच्या चमूच्या मार्गदर्शन व सहकार्याचे कौतुक करण्यात आले.

