Ajay Kandewar,Wani : शहरातील विश्वस्त मंडळ श्री हनुमान मंदिर देवस्थान, तेली फैल वणी यांच्या वतीने दि. १ एप्रिल रात्री पासूनच २ एप्रिल रोजी पर्यंत श्री हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य व आकर्षक आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र सोहळ्यात वणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भक्तीमय वातावरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात १ एप्रिल बुधवारी रात्री १० वाजता जागृती भजनाने होणार असून, हे भजन श्री ईश्वर पोटे आणि भजन मंडळ, वणी यांच्या सुमधुर सादरीकरणातून पार पडणार आहे. त्यानंतर २एप्रिल पहाटे ४:३० वाजता श्रींचा अभिषेक, महापूजा, दहीहंडी व काल्याचा धार्मिक कार्यक्रम विधिवत संपन्न होईल. २एप्रिल सायंकाळी ४:३० वाजता श्री हनुमान पालखी सोहळा, महाआरती आणि भक्तीमय वातावरणात महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, विश्वस्त मंडळ श्री हनुमान मंदिर देवस्थान, तेली फैल वणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य महाप्रसाद हा वणीकरांसाठी श्रद्धा, एकात्मता आणि सेवाभावाचा अद्वितीय संगम ठरणार आहे. सर्व नागरिकांनी या पुण्यप्रसंगी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा व धार्मिक परंपरेचा गौरव वाढवावा, असे मनापासून आवाहन आयोजक विश्वस्त मंडळाने केले आहे. महाप्रसादसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असेही कळविण्यात आले आहे.

