Monday, July 27, 2026
HomeBreakingवणीत श्रमिकांचा सन्मान ;फळ-भाजी विक्रेत्यांना छत्री वाटप.....

वणीत श्रमिकांचा सन्मान ;फळ-भाजी विक्रेत्यांना छत्री वाटप…..

Wani : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी शहरात आमदार संजय देरकर यांच्या पुढाकाराने फळ व भाजी विक्रेत्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले. उन्हात-पावसात कष्ट करणाऱ्या विक्रेत्यांना उपयुक्त भेट देत वाढदिवस समाजाभिमुख पद्धतीने साजरा करण्यात आला.

यावेळी आमदार संजय देरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल गौरवोद्गार काढत, समाजातील कष्टकरी घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. या उपक्रमाचे फळ व भाजी विक्रेत्यांनी स्वागत करत आयोजकांचे आभार मानले. यावेळी आ. संजय देरकर यांच्यासह संजय निखाडे, योगिता मोहोळ, सुरेखा ढेंगळे, सविता आवारी,सुनंदा गुहे, प्रभा आसेकर, वैशाली देठे, गीता उपरे, किर्ती देशकर, सीमा बालगोणी, चंदा मून, कांचन देरकर, प्रणाली देऊळकर, अलका कुचनकर यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

पुरुष व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page