Ajay,Wani:- शहरातील निवासी वस्त्यांमध्ये फटाक्यांची दुकाने थाटून सर्रास विक्री व साठवणूक केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार यांनी २९ ऑक्टोबर रोजी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित फटाके विक्रीच्या दुकानांची तातडीने तपासणी करून नियमबाह्य व्यवसायावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
फटाके हे ज्वलनशील व स्फोटक स्वरूपाचे असल्याने निवासी वस्त्या, बाजारपेठा, अरुंद रस्ते आणि लहान मुलांची वर्दळ असलेल्या परिसरात त्यांची विक्री व साठवणूक करणे धोकादायक ठरू शकते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनातून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, संबंधित दुकानांची प्रत्यक्ष पाहणी, विक्री परवाने व अटींची पडताळणी, अग्निसुरक्षा यंत्रणा, साठवणुकीची जागा आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलीस, अग्निशमन, महसूल आणि संबंधित सक्षम विभागांच्या संयुक्त पथकाद्वारे तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर विक्रीबंदी व कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा विषय केवळ कागदी निवेदनापुरता मर्यादित न ठेवता प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष कारवाई करावी.अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी कोण घेणार?असा सवालही उपस्थित होत आहे.गदी निवेदनापुरता मर्यादित न ठेवता प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष कारवाई करावी.

