Ajay,Wani : लालपुरिया येथील कोळसा प्लॉटचा प्रश्न आता केवळ प्रदूषण, वाहतूक आणि नागरिकांच्या त्रासापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर या प्रकरणाला एका समूहावर होत असलेल्या चर्चेने संशयास्पद आर्थिक चर्चेचेही वळण मिळत असल्याचे विश्वसनीय माहिती आहे.
या प्रश्नावर अनेक निवेदने देण्यात आली, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतही चर्चा होऊन निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थितीत अपेक्षित बदल दिसत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, या विषयाशी संबंधित एका अधिकृत समूहातील चर्चेतून काही कोळसा प्लॉटधारकांना संबंधित ठिकाणी थांबविणे अथवा व्यवसाय सुरू ठेवण्यासंदर्भात कथित आर्थिक देवाणघेवाणीचा मुद्दा एका अधिकृत ग्रुप वर चर्चेत आल्याची माहिती समोर येत आहे. त्यात “५० चा फटाका” उल्लेख होत असल्याने या व्यवहारामागील नेमके गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
एकीकडे जनतेच्या प्रश्नांसाठी “संघर्षाचा” आव आणायचा आणि दुसरीकडे त्याच “जनतेचा आरोग्याचा” नावाखाली काहींच्या हितसंबंधांना “आर्थिक संरक्षण” मिळत असल्याची चर्चा अधिकृत “समूहात” होत असेल, तर हा प्रकार गंभीर मानावा लागेल. तो संघर्ष जनतेच्या हक्कांसाठी की काहींच्या खिशासाठी? “५० चा फटाका Game ” कथित प्रकार नेमका कोणासाठी कोण यात “Extra Hero गिरी” करतोय कोण आणि कोणत्या कारणासाठी, याचा खुलासा होणे आवश्यक आहे आणि या बाबीला समोर समोर ढकलण्यात “संघर्ष” कुणाचा?. दिवाळीच्या तोंडावर काहींच्या “फटाक्याचा” गणितांची जुळवाजुळव सुरू असल्याच्या चर्चांनाही त्यामुळे उधाण आले आहे. जिल्हाधिकाऱ्यानी आणि पोलिसांनी या अधिकृत समूहातील संपूर्ण संभाषणाची सत्यता तपासून “कथित 50 फटाका Game “काय निष्पक्ष चौकशी करावी. कारण लालपुलीयातील कोळशाचा प्रश्न सोडविण्याऐवजी त्याभोवती “फटाका Game”संशयाचे जाळे निर्माण होत असेल, तर जनतेच्या विश्वासाशी हा खेळ ठरेल.

