Thursday, April 30, 2026
HomeUncategorizedवणी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतेत थेट जनतेतून सरपंच निवड..........

वणी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतेत थेट जनतेतून सरपंच निवड……….

• ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर..

अजय कंडेवार,वणी :  सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी अवघ्या काही दिवसांत आचारसंहिता लागू करण्यात येइल या निवडणुकीचा निकाल हा दोन दिवसांनी म्हणजे 20 डिसेंबरला समोर येईल. तसेच तालुकानिहाय कार्यक्रम देखील जाहिर झालेले आहे .त्यात वणी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतेत थेट जनतेतून सरपंच निवड करण्यात येणार आहे.

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम :

१) ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.२) नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील.

३) नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल.

४)नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.

५) मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.

६)नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.

७)मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page