Thursday, August 6, 2026
HomeBreakingरेल्वे क्रॉसिंगपर्यंतचा रस्त्यासाठी शिंदेसेनेचे शिवराज पेचे यांची धडाडी.....

रेल्वे क्रॉसिंगपर्यंतचा रस्त्यासाठी शिंदेसेनेचे शिवराज पेचे यांची धडाडी…..

Ajay ,Wani : शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा,आरोग्याचा आणि दैनंदिन वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आणत शिंदेसेना शहरप्रमुख शिवराज पेचे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांकडे धडक पाठपुरावा केला. बाजार समितीच्या मागील गेटपासून रेल्वे क्रॉसिंगपर्यंतचा दोन्ही बाजूंचा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांमुळे धोकादायक बनला असून, नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी संबंधित अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिली तसेच पूल बांधकाम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना त्रास होत आहे याबाबतही सकारात्मक चर्चा पीडब्ल्यूडी चे अधिकाऱ्यांनी शिंदे सेनेचे शहर प्रमुख यांच्याशी केली.

यासंदर्भात शिवराज पेचे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना सविस्तर निवेदन सादर करत या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करत, नागरिकांच्या जीविताशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

विशेष म्हणजे, वणी शहर प्रमुख शिवराज पेचे यांच्या जनहिताच्या मागणीची वणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ आणि सकारात्मक दखल घेतली. संबंधित अभियंत्यांनी केवळ मौखिक आश्वासन न देता, रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्यात येईल, असे नमूद करणारे कार्यालयीन पत्र जारी करून अधिकृत आश्वासन दिले. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने संवेदनशील आणि जबाबदार भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page