Tuesday, August 4, 2026
HomeBreakingलालपुलिया परिसरात नियमबाह्य ट्रकाना E-chalan रट्टा......

लालपुलिया परिसरात नियमबाह्य ट्रकाना E-chalan रट्टा……

Ajay,Kandewar ,Wani : शहरातील लालपुलिया परिसरात रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीने ट्रक उभे केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढत असल्याची दखल घेत वाहतूक शाखेने विशेष कारवाई मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पथकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकांवर मोटार वाहन कायद्यातील कलम 122/177 अंतर्गत ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई सुरू केली असून आतापर्यंत सुमारे 25 वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

लालपुलिया परिसरात कोल डेपो, गॅरेज, ऑटोमोबाईल्स व पेट्रोल पंप असल्याने येथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते. अनेक ट्रक चालक रस्त्यावरच वाहने उभी करून कोळशावर ताडपत्री बांधत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. याची गंभीर दखल घेत वाहतूक शाखेने कोल डेपो चालक, ट्रान्सपोर्ट मालक व वाहनचालकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कोळसा भरल्यानंतर ताडपत्री ही डेपो परिसरातच बांधावी, कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर ट्रक उभा करून हे काम करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत लालपुलिया परिसरात वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी अशा विशेष कारवाया केल्या जात असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे वणी वाहतूक शाखेचे P.I नरेश रणधीर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुजोर ट्रान्सपोर्ट मालक व नियमबाह्य पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page