Ajay,Wani : चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योजक जयंतजी मामीडवार आणि राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवरावजी भोंगळे हे सपत्नीक रविवारी (२० सप्टेंबर) वणी तालुक्यातील कायर गावात येथे दाखल झाले. त्यांच्या आगमनानंतर कायर ग्रामपंचायतीच्या वतीने दोन्ही मान्यवरांचे भव्य थाटात स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत कायरचे सरपंच नागेश घणकसार तसेच मोडक परिवाराच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रपूरचे नगरसेवक पप्पू देशमुख, युवा उद्योजक योगेशजी मामीडवार यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
कायर येथील स्वागत सोहळ्यानंतर उद्योजक जयंत मामीडवार आणि आमदार देवराव भोंगळे हे बाबापूरकडे रवाना झाले. बाबापूर येथील सार्वजनिक गणेश मंडळाला भेट दिल्यानंतर मंडळाच्या वतीने चार एकर जमिनीवर 200 ट्रकांचे मुरूम अशी भरीव मदत करणारे उद्योजक जयंत मामीडवार व संतोष जुनघरी यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. बाबापूरच्या गणेशोत्सवासाठी त्यांनी केलेल्या सहकार्याची दखल घेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले. भाविकांच्या सुविधेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान करण्यात आला.
याच कार्यक्रमात बाबापूर येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार देवराव भोंगळे आणि त्यांच्या पत्नी यांचाही सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने शाल-श्रीफळ देऊन जंगी सत्कार करण्यात आला. चंद्रपूरहून कायर आणि त्यानंतर बाबापूर असा एकत्रित दौरा करत आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे गणेश मंडळाच्या कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले. बाप्पाच्या सेवेत योगदान देणाऱ्या जयंत मामीडवार यांच्या कार्याची घेतलेली दखल आणि आमदार भोंगळे दाम्पत्याचा झालेला सन्मान हा या भेटीचा प्रमुख भाग ठरला.
कोट…
बाप्पानेच या सेवेसाठी माझी निवड केली:- जयंत मामीडवार
“बाबापूर सार्वजनिक गणेश मंडळाच्या सदस्यांनी चार एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी मुरूमाची आवश्यकता असल्याचे एका मध्यस्थीकडून सांगितले. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता सुमारे २०० ट्रिप मुरूम व क्रेशर मटेरियल उपलब्ध करून दिले. ही भरीव मदत केवळ भाविकांची गैरसोय दूर व्हावी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना चांगली सुविधा मिळावी, या भावनेतूनच केले. २० सप्टेंबर रोजी ही पार्किंग व्यवस्था पाहण्यासाठी आलो असता चार एकरच्या जागेत हजारो वाहने व्यवस्थित उभी असल्याचे पाहून समाधान वाटले.

