विदर्भ न्यूज डेस्क,वणी: तालुक्यातील साखरा कोलगाव या रेतिघाटावर रेती उत्खनन हे नियमाला समोर ठेऊन करण्यात येत आहे. या अगोदर अश्या काहीं अफवा समोर आलेल्या होत्या की रेती घाटावर अवैद्य रेती उत्खनन व घरकुलला रेती मिळत नसल्याची माहिती समोर आली होती शिवाय बनावट आधार कार्ड बनवून रेती विकल्या जात असल्याचे माहिती समोर आली होती.त्या आरोपाचे खंडन करीत ते सर्व खोटे अफवा आहेत कारण बनावट आधार कार्ड ही संकल्पनाच नाही कारण रेती लाभार्थीना रेती बुक करीत असताना त्यांनी दिलेला रजिस्टर मोबाईल क्रमांकावर तीनदा ओटीपी येत असतो, मग आधार कार्ड बनावट कसे ? असे स्पष्ट शब्दात तहसीलदार निखिल धुळधर यांनी सांगितले.
रेती घाटात पोकलँड द्वारे अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे तसेच बनावट आधार कार्ड बनवून रेती विकल्या जात असल्याचे म्हटल्या गेले. याबाबत तहसीलदार यांना विचारणा केली असता असा कोणताही प्रकार साखरा कोलगाव रेती घाटावर सुरू नसल्याचे स्पष्ट सांगितले. कारण तिथे सीसीटिव्ही फुटेज आहे डाटा बेस सर्व माहीती दररोज अपडेट आहे.या व्यतिरिक्त काहीं तक्रारी असेल तर नक्कीच आम्ही शासन स्तरावर कारवाई करू असेही बोललेत.सोबतच आपण या घाटाला स्वतः भेट दिली तेव्हाही घटनास्थळी कोणतेच पोकलँड दिसून आले नाही.तसेच अवैधरित्या रेती उत्खनन केल्याचे काही दिसून आले नाही. रेती तस्कर महसूल विभागाच्या रडारावर आहे.
“मागील काही दिवस निवडणूक कामात असल्याने रेतीकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. परंतु आता असे काही गैरप्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सदर रेती घाटावर आम्हीं स्वतः पथकासोबत पाहणी केली असता असे कोणतेही गैरप्रकार निदर्शनास आले नाही.तरीही जर बिनबुडाचे आरोप होत असल्यास याला काही करू शकत नाहीं व वणी विधानसभा क्षेत्रातून तर रेतीचा सध्यातरी तक्रारी नाही असे असल्यास त्यावर आम्हीं समस्या सोडविण्यास सक्षम राहू “– वणी तहसीलदार ,निखिल धूळधर