अजय कंडेवार,वणी :- तालुका काँग्रेस उपाध्यक्षपदी नंदकिशोर अंबोरे यांची निवड झाली असून या निवडीचे सर्वञ स्वागत व अभिनंदन होत असून, सदर निवड हे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले . तसेच नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर व माजी आ. वामन कासावार यांच्या मार्गदर्शनात व पावडे यांच्या शिफारशीनुसार नियुक्ती पञ देण्यात आले.Appointment of “Nandkishore Ambore” as Congress Taluka Vice President.
नंदकिशोर अंबोरे हे उच्च शिक्षित, असून काँग्रेस पक्षातील निष्ठावान,पक्षनिष्ठ युवक म्हणून त्यांची ओळख. उच्च शिक्षण घेऊन ही समाजकारण व राजकारणाची आवड असल्याने त्यांनी पदार्पण केले. तसेच कायर गावातील चाणाक्ष ग्रा. पं . सदस्य म्हणूनही त्यांची विशेष ख्याती आहे दरम्यान काँग्रेस पक्ष संघटन तळा गाळात वाढवण्यासाठी अतिशय तळमळीने निष्ठेने काम करत कार्यकर्ते जोडत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे नंदू यांची काँग्रेस पक्षाच्या द तालुका उपाध्यक्ष पदी वर्णी लागल्याने तालूक्यातील राजकारण व समाजकारणातील कर्मचारी तथा महिला भगिनीं विशेष आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांचा या निवडीने तालुक्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
• वणीत काँग्रेस कात टाकतंय –
वणी तालुका काँग्रेसचे
कट्टर कार्यकर्ता म्हणून नंदू ची विशेष ओळख आहे .हे मागील अनेक वर्षापासून तालुक्यात काँग्रेसच्या संघटन वाढीसाठी काम करत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाला राज्यात चांगले यश मिळाले. या निवडणूकीपूर्वी वणी तालुक्यातही काँग्रेस पक्षात चांगलेच इन्कमिंग झाले होते. अनेक दिग्गजांचा यांच्या नेतृत्वाच पक्षाने कात टाकून नव्याने उभारी घेतल्याचे दिसते. अशात आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्ष जोराने कंबर कसताना दिसत असून आपली छाप आगामी निवडणूकीत पाडून दाखवेल असे दिसत आहे.