Ajay Kandewar,Wani:- तालुक्यात दिपक टॉकीज परीसरात शनिवारी सायंकाळी 6 वाजता छिन्न विच्छिन्न अवस्थेत गाईचे मांस सापडल्यानंतर शेकडो स्थानिक आणि गौ-सेवक यांनी मोठी गर्दी केली.वणी पोलिसांना घटनास्थळी पोहोचून चौकशी करताना दिसून येतं आहे.काही काळ त्याठिकाणी अनेक पक्षाचे पदाधिकारी यांनी रस्त्यावर गोंधळ घालत आरोपींविरुद्ध घोषणाबाजी करताना दृश्यांमध्ये दिसत आहे.
विशेष म्हणजे ही अतिशय निंदनीय घटना आहे. या परीसरात गुरांचे छिन्नविछिन्न मुंडके सापडले आहे, त्यामुळे संपूर्ण शहरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे तसेच वणीत मोठया प्रमाणात गायीचा मासाची विक्री होते यातला संशय बळावला आहे.हिंदू संघटनांच्या सदस्यांनी गंभीर चिंता व्यक्त करून आरोपींवर कारवाईची मागणी केली
“रामनवमी समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी जाहिर निषेध केला आहे.येत्या काही दिवसांत याबाबत मोठें आंदोलन उभारणार असल्याची माहिती विदर्भ न्यूज ला दिली आहे.
.