Tuesday, February 17, 2026
Homeवणीसाहेब' पाणी पुरवठा सुरळीत करा; अन्यथा.....

साहेब’ पाणी पुरवठा सुरळीत करा; अन्यथा…..

•संजय खाडे यांचा पालिकेला अल्टिमेटम्.

अजय कंडेवार,वणी:शहरात गेल्या महिन्याभरापासून पाणी पुरवठा होत नसल्याने वणीकर आक्रमक झाले आहेत. शहरातील नागरिकांना पाण्याच्या भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. भर उन्हाळ्यात गेल्या महिन्यांपासून एक-एक आठवडा नळ येत नसल्याने सर्वसामान्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्याकरिता संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित,अध्यक्ष जय जगन्नाथ अर्बन निधी लि. वणी व संचालक दि वसंत सह. जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी,वणी संजय खाडे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेतं नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याशी पाणी पुरवठा सुरळीत करण्याकरीता चर्चा करीत निवेदन दिले जर येत्या एका आठवड्यात पाण्याची समस्या सुटली नाही तर नगरपालिकेसमोर वणीकरांनासोबत घेत मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.अनेक महिन्यांपासून वणीत अपुरा पाणी पुरवठा होत आहे. आधी उन्हाळा नसल्याने याचा सर्वसामान्यांना जास्त फटका बसत नव्हता. मात्र आता भर उन्हाळ्यात गेल्या महिन्यांपासून एक-एक आठवडा नळ येत नसल्याने सर्वसामान्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. पाणी येत नसल्याने अनेक लोकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे, त्यामुळे मोठा आर्थीक फटकाही वणीकरांना बसत आहे.

संपूर्ण उन्हाळा वणीकर अपु-या पाण्याने काढत आहे. काहींना तर पिण्याचे पाणी देखील मिळत नाही. याबाबत अनेकदा मुख्याधिकारी यांना सर्वसामान्य वणीकरांनी सूचना केल्या होत्या. मात्र पाणी समस्या काही केल्या सुटली नाही. त्यामुळे वणीकर चांगलेच हैराण झाले आहेत. येत्या एक आठवड्यात वणीकरांची पाणी समस्या सोडवावी, अन्यथा वणीकरांना सोबत घेऊन नगर पालिकेसमोर मोठे आंदोलन केले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

यावेळी राजाभाऊ पाथ्रडकर, साधना गोहोकर, शारदा ठाकरे, अशोक चिकटे, प्रेमनाथ नैताम, पीएस उपरे, प्रमोद लोणारे, पलाश बोढे, क्रिष्णा पचारे, सुरेश बनसोड, लता भोंडाळे, मिनाक्षी रासेकर, पद्मा ताजणे, सारिका बोबडे, संगिता खाडे, विजयालक्ष्मी आगबत्तलवार, ललिता बरशेट्टीवार, मंगला झिलपे, सविता रासेकर, अशोक पांडे, कैलास पचारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments