अजय कंडेवार,वणी: सीबीएसई 10 वी चा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला, या निकालात पूनवट येथील डी. ए. व्ही पब्लिक स्कूल (वेकोली),या निकालात वणी येथील निर्मिती दिलीप भोयर या विद्यार्थिनीने 85.40 टक्के गुण घेत दहावीचा परीक्षेत प्रथम श्रेणीत येण्याचा मान पटकाविला.D.A.V School’s “Nirmiti Dilip Bhoyar” got 85 percent in 10th.
“निर्मिती ” ने गणित व विज्ञान अतिशय चांगले गुण मिळवून तसेच सामाजिक विज्ञान आणि विज्ञानामध्ये ही चांगले गुण मिळवून प्रशंसनीय कामगिरी साध्य केली आहे.D.A.V शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना, “निर्मिती”ने तिच्या शिक्षकांकडून मिळालेल्या अमूल्य मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे कौतुक केले. तिने शाळेचा संपूर्ण अभ्यास साहित्य आणि कठोर प्रशिक्षण पुरविल्याबद्दल श्रेय दिले, ज्यामुळे तिला कठीण संकल्पना प्रभावीपणे समजून घेता आल्या.
“निर्मिती “चे वडील दिलीप भोयर हे वणी उपविभागातील समाजसेवक तसेच राजकारणातही उत्कृष्ठ स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच “निर्मिती”ची आई देखील मुलीचा भविष्याकरीता एक छोटासा झेरॉक्स काढण्याचा व्यवसाय करुन घर सांभाळ करायची आणि सायंकाळी घरी आले की, मुलीचा गृहपाठ नेहमी घेत असायची .शेवटी दहावीचा निकाल घोषित झाले आणि “निर्मिती “ने अतीशय चांगले गुण प्राप्त करीत आई वडिलांना आनंदाचा एक क्षण दिला, तीने दहावीनंतर आता C.A बनण्याचे ध्येय ठेवले आहे. या स्वप्नपूर्तीसाठी ती अहोरात्र अभ्यास करणार असल्याचेही माध्यमांना सांगितले.तिने आपल्या या यशाचे श्रेय शिक्षक, आई व वडिलांना दिले.