अजय कंडेवार,वणी:- फेब्रुवारी महिन्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याना वणी पोलीस पथकाने कसून तपास करीत नागपूर गाठत 2 अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून 2 लाख 38 हजार 168 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ( 2 thief arrested by Wani police)
सविस्तर वृत्त, शंकर किसन गुगुल वय ४२ वर्ष (रा. सहारा पार्क) वणी, जि-यवतमाळ यांनी वणी पोलीस स्टेशनला 8 फेब्रू रोजी अज्ञात चोरट्यानी भरदिवसा घराचें कुलूप तोडून अज्ञातांनी प्रवेश करून लोखंडी कपाटातून १) सोन्याची पोत कि 1 लाख 60 हजार रू व २) कानातले दोन सोन्याचे रिंग किंमत 1 लाख 73 हजार रूपयाचा मुद्देमाल चोरीस गेल्याची रीतसर तक्रार दाखल केली होती.त्यावरून वणी पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गून्हा दाखल करण्यात आला होता.
त्यावरून वणी ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल बेहेरानी यांनी काही पथके तयार केलें. त्यावरून नियुक्त केलेल्या पथकांनी तर्क-वितर्क लावीत, या प्रकरणाचा शोध लावण्यास सुरुवात केली . घटनास्थळी उपलब्ध असलेले सर्व सि.सि.टी.वी फुटेज प्राप्त करून बारकाईन पाहणी करून सविस्तर पडताळणी केली असता त्यामधे 2 संशयीत इसमांनी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले त्यावरून पोलिसांनी वरोरा ते नागपुररोडवरील टोल नाका परिसरातील सीसीटीव्ही ची ही पाहणी केली. परंतु त्या संशियातानी त्यांचे वाहन सीसीटीव्ही मध्ये दिसू नये याकरिता टोल नाक्याच्या मेन गेट मधून न जाता बाजूचा कच्या रस्त्यांनी वाहन घेऊन निघून गेले. परंतु सीसीटिव्ही हिंट ने संशयीतांचे फोटो कॉपी काढून नागपुर पोलीसांचे मदतीने डी.बी.पथकाने त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.त्यातील एक आरोपीत इसम हा नागपुरव दुसरा आरोपीत इसम हा भंडारा येथील कारागृहामध्ये चोरीचा गुन्हयात अटक असल्याची माहीती प्राप्त झाली. गुन्हयाची माहीती प्राप्त करून त्यांचा वि.न्यायालयामधुन प्रोड्युस वॉरंट प्राप्त करून दोन्ही आरोपी१)आकाश उर्फ गोलु दिलीप रेवडीया (वय २९ वर्ष) २) पंकज श्रावण खोकरे( वय ३९ वर्ष) रा. हुडकेश्वर जि. नागपुर यांना नागपुर तसेच भंडारा येथील कारागृहामधुन त्यांचा ताबा मिळवुन घरफोडीचा गुन्हयात अटक करून वणी पोलिसांना तपास केला असता,त्यांनी स्वतः कबुली दिली. सदर प्रकरणामध्ये एक पिवळ्या धातुनी लगड़ी वजन ६८.४०० रुपये तोळा प्रमाणे२ लाख ३८ हजार १६८ रुपये मुद्देमाल दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आली.
सदरची कार्यवाही वरिष्ठांचा आदेशाने Dysp गणेश किंद्रे यांच्या सूचनेनुसार वणी ठाणेदार PI अनिल बेहेरानी यांचे मार्गदर्शनात API दत्ता पेंडकर, PSI बलराम झाडोकार, PSI सुदाम आसोरे, सुहास मंदावार, विकास धडसे, पंकज उंबरकर,मो. वसीम, शाम राठोड, विशाल गेडाम, भानु हेपट व विकास ब्राम्हण यांनी पार पाडली .by-wani-police-another-one-crime-detection-2-thief-attested