अजय कंडेवार,वणी:- ३५ वर्षीय शिक्षकाने कायर येथील भुडकेश्वर मंदिरासमोरच विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना कायर परिसरात घडली. हा प्रकार रविवार दुपारी उघडकीस आला. ही घटना वाऱ्यासारखी पसरताच परीसरात खळबळ उडाली आहे.
बळी कवडू जुमनाके (३५) रा.साखरा (दरा) येथे राहणारा हा सुशिक्षित तरुण कायर येथील एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होता.तो कुटुंबासह कायर येथे भाड्याने राहायचा.रविवार ता .10 मार्च रोजी भर दुपारचा वेळेस या शिक्षकाने लगतच असलेल्या कायर येथील भुडकेश्वर मंदिरासमोरच विषारी औषध प्राशन केले जागेवरच पडून राहिला. मृतक बळी जुमणाके दुपारचा सुमारास पडलेल्या अवस्थेत दिसल्याने तेथील काहीं लोकांनी जवळ जाऊन बघितले असता सदर शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला होता.The incident in front of the Bhudkeshwar temple.
लगेच या घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना देण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळ पंचनामा करून बळी जुमनाके चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.मृतकाचा पाठीमागे पत्नी व मुलगी आहे. याने टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप अस्पष्टही कळू शकले नाही .पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.