अजय कंडेवार,Wani:- विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात तिकीट मिळवण्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच आता संपुष्टात आली.आता त्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारी मिळाली. यात माञ शंका राहिली नाहीं.Pratibha Dhanorkar became the official candidate of Chandrapur Lok Sabha Congress.
भारतीय जनता पक्षाने 13 मार्च रोजी जाहीर केलेल्या यादीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते हंसराज अहिर यांचे तिकीट कापून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आले होते. यानंतर चंद्रपूर येथील गांधी चौकात त्यांच्या स्वागत सभेचे आयोजन करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व मंदिरांमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून प्रार्थना करण्यात आल्या.गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या भाजपच्या प्रचारादरम्यान काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर चर्चा सुरू झाली. दिल्लीत बसलेल्या काँग्रेस हायकमांडने दोनपैकी एक नाव निश्चित करण्यात दिरंगाई केली. दरम्यान, काही धानोरकर गटात आनंदाचे वातावरण असताना वडेट्टीवार गटात निराशा पसरली आहे.
नुकतेच विजय वडेट्टीवार यांनी आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार यांना लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र हे प्रकरण दिल्लीच्या हायकमांडपर्यंत पोहोचताच परिस्थिती उलटी झाली. स्वत: विजय वडेट्टीवार यांना लोकसभेच्या तिकिटावर निवडणूक लढवायची असेल, तर त्यांना हे तिकीट दिले जाईल, अन्यथा या तिकिटावर प्रतिभा धानोरकर यांना संधी दिली जाईल, असे सांगण्यात आले. कदाचित वडेट्टीवार यांनी ही ऑफर धुडकावून लावली असावी, त्यामुळे अंतिम निर्णय प्रतिभा धानोरकर यांच्या बाजूने आला. परिस्थिती कशीही असली तरी आता धानोरकर यांना हे तिकीट मिळाल्याने भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात कडवी लढत होण्याची शक्यता आहे? कारण ही जागा भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची बनली आहे.