अजय कंडेवार,Wani :- वणी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये भेट देवून नागरिकांशी अडीअडचणी,समस्या जाणुन घेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांनी गावभेट दौऱ्याला सुरूवात केली आहे. त्यांनी अलीकडे मतदारसंघांतील बहुतांश गावे पिंजून काढत प्रचारात आघाडी घेतली. या भेटी गाठी आणि दौऱ्याला नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन जनाधार त्यांच्या सोबत असल्याचे पहावयास मिळत आहे.
वणी मतदार संघात शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार युवकांच्या अनेक समस्या आ वासून उभ्या असताना त्यात भरीस भर म्हणुन अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे तसेच पूरग्रस्त गावातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या पीडित शेतकरी,नागरिकांना आधार देत त्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी उंबरकर यांनी मतदार संघातील गावांमध्ये काही महिन्यांपासून गावभेट दौरे आयोजित केले आहेत.त्यामध्ये गावांना भेटी देत गावकऱ्यांच्या अडीअडचणी,प्रश्न शासन दरबारी असलेल्या प्रलंबित समस्या यांची माहिती जाणुन घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला. नागरिकांमध्ये उंबरकर यांच्या कार्याप्रती आपुलकी निर्माण होवून नागरिक सुद्धा आपल्या समस्या घेवुन त्यांच्याकडे येत असतात उंबरकर यांच्या गावभेट दौऱ्याला जनतेमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असुन आपल्या समस्या केवळ उंबरकरच सोडवू शकतात अशी जनतेमध्ये जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत असुन .या गाव भेटीमुळे उंबरकर यांच्यापाठीशी प्रचंड मोठा जनाधार आजमितीला तयार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे याचा कितपत फायदा उंबरकर यांना आगामी निवडणुकीत होतें हे पाहणे महत्वाचे ठरेल..