अजय कंडेवार,Wani:- “हमारा बुथ सबसे मजबुत ” महायुतीमध्ये प्रत्येक पक्ष वेगळ्या विचारांचा आहे, पण दिशा एकच आहे. त्यामुळे एखाद्या प्रसंगाला एकमेकांचा राग आला तरीही तो महायुतीवर किंवा आपल्या पक्षावर काढायचा नाही, असा निर्धार करा. आपल्याला एकत्र येऊन समन्वय ठेवायचा आहे. ‘हमारा बुथ सबसे मजबुत’ हा भाव ठेवून काम करा. त्यासाठी आपला पक्ष आणि महायुती मर्यादित ठेवू नका. प्रत्येकाने विकासाची गाडी धावत राहील यासाठी प्रयत्न करावे,असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी विनायक मंगल कार्यालयात गुरुवारी दि. 21 मार्च ला मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात केलें.”Our booth is the strongest…”- No. MungantiwarBjp Worker’s meeting concluded, criticism drawn on Congress.
या कार्यकर्ता मेळाव्यात वणी मतदार संघातील कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. या व्यासपिठावर आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ. मदन येरावार, आ. अशोक उईके, संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, तारेंद्र बोर्डे, रवी बेलुरकर,राजेंद्र महाडोळे, राम लाखीया आदी भाजपा नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते.
•आघाडीचा लोकसभा मतदारसंघ व्हावा, असाही प्रयत्न….
” मी संसदेत जाईन तेव्हा महाराष्ट्राचा आवाज देशभर पोहोचवण्याचे कार्य करेन. हे कार्य करत असताना चंद्रपूर-वणी-आर्णी हा आघाडीचा लोकसभा मतदारसंघ व्हावा, असाही प्रयत्न करेन. मला लोकसभेत पाठविले तर तुम्हाला तुमचा निर्णय योग्य ठरल्याचा आनंद वाटेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज देशगौरव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी संधी दिली असून या संधीचे सोने करण्यासाठी जनता पूर्ण सहकार्य करेल याचा विश्वास आहे. पण त्याचवेळी विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही, या सूत्रावरच काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.”
•पत्रकार परिषदेत काँग्रेसवर ओढले ताशेरे….
“कांग्रेस ने केलेली 50 वर्षाची घाण तिसऱ्यांदा धुवावी लागेल म्हणत विरोधकांच्या कार्यप्रणालीवर फटकारे ओढले तसेच कॉंग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीवर टिकाही केली.