अजय कंडेवार, वणी:- वणी पोलिसात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी वाहन चोरण्याबाबतच्या तक्रारी येत होत्या. परंतु पोलिसांना चोरटे गवसत नसल्याने चोरटे चांगलाच डाव साधत होते. सकाळी खबरीकडून मिळालेल्या माहितीनुसार विविध गुन्ह्यातील 3 चोरट्याना जेरबंद करण्यात वणी पोलिसांना यश मिळाले आहे.Performance of the wani police, various crimes of theft exposed.
दि.०८ जानेवारी रोजी फिर्यादी आशिष अशोक देठे (२७ ) रा.जैन ले आउट, वणी ता.वणी यांनी फिर्याद त्यांची एक काळया रंगाची पॅशन -प्रो मोटार सायकल क.MH 29-AF-8378 शहरातीलच एका बार समोरून चोरीस गेली होती, त्यावरून पो.स्टे लाकलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद होता मिळालेल्या माहितनुसार डी.बी प्रमुख पोउपनि झाडोकार व डि.बी पथक हे भद्रावती येथे रवाना होऊन पुनमचंद बंडु पोहिंनकर (२४ ),रा. नांदाबीबी, ता. कोरपना जि. चंद्रपुर व गोलु संजय वरवाडे (२१) रा. भद्रावती जि. चंद्रपुर येथुन गुन्हयात चोरी गेलेली मोटर सायकल MH 29-AF-8378 दुचाकी डीबी पथकाकडून जप्त करण्यात आली.
तसेच दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश शामराव ठुमणे रा. लक्षमीनगर वणी यांची हीरो सस्प्लेंडर गाडी क MH 29-X-4688 ही लक्ष्मीनगर वणी येथुन चोरीस गेली होती त्यावरून अज्ञात इसमाविरुद्ध कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा तपासावर होता. तेव्हढ्यातच एक ईसम चोरीची मोटर सायकल वणी बस स्टँड जवळ विक्री करणार आहे अशी गोपनिय माहीती मिळाली यावरून पोलीस कर्मचारी विकास धडसे व त्यांचे पथक यांनी सापळा रचुन एका संशियिताला ताब्यात घेवुन त्याचे नाव विचारले असता प्रफुल रमेश चवखे रा.गुडगाव, ता.भद्रावती जिल्हा -चंद्रपुर त्याचे कडुन MH 29-X-4688 तसेच दोन विना नंबर प्लेट मोटर सायकल जप्त करून ताब्यात घेतली असता एकुन ०३ मोटार सायकल धडसे व यांचा चमुकडून दोन विविध गुन्हे उघडकीस आणण्यात आले .
सदरची कार्यवाही SDPO गणेश किंद्रे,PI अनिल बेहेरानी वणी यांचे मार्गदर्शनात PSI बलराम झाडोकार, ASI सुदर्शन वानोळे, विकास धडसे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम,मो. वसीम, श्याम राठोड़,सागर सिडाम,शुभम सोनुले व गजानन कुडमेथे यांनी केली.