अजय कंडेवार,वणी: आयएम्ए ही डॉक्टरांची राष्ट्रीय स्तरावर काम करणारी संघटना आहे. आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशन. जवळपास ही संघटना अनेक वर्षापासुन शहरात कार्यरत आहे. यात ४२ स्पेशालिटी डॉक्टरांचा समावेश आहे .वणीत आयएमए २०२४ नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा शनिवारी (दि.२) वणी येथील वसंत जिनिंगच्या हॉलमध्ये पार पडला.Instalation Ceremony of I.M.A completed in Wani.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर एम्स येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनिष श्रीगिरीवार, अमरावती येथील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. पवन टेकाडे, आयएमए महाराष्ट्र माजी अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ज्येष्ठ पोटविकार तज्ज्ञ डॉ. मनोज व्यवहारे व वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल बेहरानी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ.श्रीगिरीवार यांनी अवयवदान याविषयी माहिती दिली. आयएमए वणी ला सर्व प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले.दुपारी प्रमुख वक्ते डॉ. मनोज व्यवहारे यांनी लिव्हर व पोट विकार यासंदर्भातील विविध रोग व उपचार यावर उपस्थित डॉक्टरांना माहिती दिली. त्यानंतर IMA च्या वणी शाखेचा पदग्रहण सोहळा पार पडला. यात नवनिर्वाचित डॉ.शिरीष कुमरवार यांची अध्यक्षपदी निवड तर उपाध्यक्ष डॉ. सुनील जुमनाके यांची उपाध्यक्ष, सचिव डॉ. संकेत अलोणे , सहसचिव डॉ. स्वप्निल गोहोकार ,कोषाध्यक्ष डॉ. विकास हेडाऊ , डॉ. संचिता नगराळे यांची महिला विंग सचिव पदावर निवड करण्यात करण्यात आली.डॉ. प्रतिक कावडे यांची सांस्कृतिक सचिव तर डॉ. अभीषेक गौरकर यांची क्रीडा सचिव म्हणून निवड करण्यात आली.
वणीतील डॉ. मिलिंद व डॉ. माधुरी तामगाडगे यांची मुलगी डॉ. आकांक्षा मिलिंद तामगाडगे ह्यांची नुकतीच भारतीय पोलीस दलात आएपीयस पदी नियुक्ती झाली. दिल्ली येथे पोलीस कमिश्नर पदावर त्या रुजू आहेत. त्यांच्या या यशाबद्दल आयएमए तर्फे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा सत्कार करण्यात आला. त्यांच्या तर्फे त्यांची आई डॉ. माधुरी तामगाडगे यांनी देखील सत्कार स्वीकारला.सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता संध्याकाळी उपस्थित डॉक्टरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. संचिता नगराळे, डॉ. हुड, डॉ. प्रीती लोढा, डॉ. अलोणे, डॉ. सुनील जुमनाके, डॉ आशुतोष जाधव वसुधा भोयर यांनी आपली कला सादर केली. मृण्मयी कुमरवार हिने नृत्यकला सादर केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संकेत अलोणे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रतिक कावडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. महेंद्र लोढा व डॉ. गणेश लिमजे यांनी विशेष सहकार्य केले.
कोड…..
नवनियुक्त अध्यक्ष डॉ.शिरीष कुमरवार
” नवनिर्वाचित कार्यकारिणीकडून येत्या वर्षभरात ‘युनायटेड वुई राईज’ या वर्षीच्या ध्येय वाक्याला अनुसरून डॉक्टरांच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन सर्वांमध्ये एकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच डॉक्टरांच्या शारीरिक, मानसिक व आर्थिक स्वास्थ्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील. त्याचबरोबर ‘आयएमए व्याख्यानमाला’ आयोजित करण्याचाही मनोदय आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आणि डब्ल्यूएचओ २०२४ च्या ‘हेल्थ फॉर ऑल’ या संकल्पनेवर आधारित विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ.शिरीष कुमरवार यांनी स्पष्ट केले.”