A common voter made a public appeal to the “Congress Party”. हिच ती पोस्ट…. नक्कीच वाचा….
अजय कंडेवार,Wani :- गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने स्व. बाळूभाऊ धानोरकर यांचे आधी तिकीट कापले होते. मात्र पुढे बाळूभाऊंनी विजय मिळवला व चंद्रपूर मतदारसंघ ही काँग्रेसची महाराष्ट्रातील एकमेव जागा ठरली. ही चूक वेळीच दुरुस्त झाली नसती तर मराहाष्ट्रात पक्षाचे खाते देखील उघडले नसते. त्यामुळे गेल्या वेळी सुरुवातीला केलेली चूक काँग्रेसने पुन्हा करू नये. असे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना नम्रपणे जाहीर आवाहन आहे.
चंद्रपूर मतदारसंघासाठी प्रतिभाताई धानोरकर यांच्यापेक्षा दुसरा कोणताही सक्षम उमेदवार नाहीत. गेल्या काही काळांपासून प्रतिभाताई या चंद्रपूर लोकसभेच्या तयारीला लागल्या आहेत. त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. दांडगा जनसंपर्क, मनमिळावून स्वभाव, तळागाळातील लोकांशी थेट मिसळणे इत्यादी कारणांसाठी प्रतिभाताई या मतदारसंघात लोकप्रिय आहेत.
काही महिन्याआधी खासदार स्व. बाळू धानोरकर यांचे दु:खद निधन झाले. पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार व तडफदार नेत्याचा दुर्दैवी मृत्यू केवळ पक्षाचे कार्यकर्ते, नेते किंवा समर्थकच नाही तर सर्वसामान्य जनतेलाच्याही मनाला चटका लावून गेला. या दु:खातून मतदारसंघातील लोक अद्यापही सावरले नाहीत. त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार या जागेवर प्रतिभाताई यांचा पहिला हक्क आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी सर्वसामान्य मतदारांची तीव्र इच्छा आहे. यावेळी भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे तिकीट दिले आहे. एका कॅबिनेट मंत्रीविरोधात एक सक्षम उमेदवार देणे पक्षाने गरजेचे आहे. जातीय समिकरणे, सहानुभूतीची लाट, स्वच्छ प्रतिमा, सर्व जातीधर्मातील लोकांचे समर्थन इत्यादी कारणांमुळे प्रतिभाताईं पेक्षा दुसरा कुणी सक्षम उमेदवार राहू शकत नाही.
फक्त एका मतदारसंघापुरते वर्चस्व असलेले उमेदवार, बाहेरील मतदारसंघातील आयात उमेदवार किंवा केवळ सोशल मीडियातून इमेज बिल्डिंग करून ग्राउंडलेव्हलवर कुठलाही जनसंपर्क नसणारे उमेदवार हे पक्षासाठी सक्षम उमेदवार राहू शकत नाही. प्रतिभाताई धानोरकर या संभाव्य उमेदवार राहणार अशी चर्चा झाल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सर्व कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक इतकेच नाही तर सर्वसामान्य लोकही कामाला लागले आहे. त्यामुळे मतदारसंघात प्रतिभाताईंचा विजय निश्चित मानला जात आहे. या सर्व गोष्टींचा काँग्रेसने गंभीरपणे विचार करावा. गेल्या वेळी आधी काँग्रेसने जी चूक केली होती ती पुन्हा करू नये. यात केवळ काँग्रेस पक्षाचे नाही, तर जो सर्वसामान्य मतदार मोदीलाटेत काँग्रेसकडे आशेने पाहतोय. त्याच्यावरही हा अन्याय ठरेल. प्रतिभाताई या विनिंग उमेदवार आहे. त्यामुळे पक्षाने त्यांनाच तिकीट द्यावी, अशी नम्र विनंती आहे.
आपला,
संजय रामचंद्र खाडे,चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील,(एक सर्वसामान्य मतदार, वणी)
टिप:- हीच ती सोशल मिडीयावर व्हायरल पोस्ट……. विदर्भ न्यूज ला एका समूहात मिळालेली आहे .