अजय कंडेवार,Wani:- धावपळीचे जीवनमान, अनेक व्याप,चुकीची आहारशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. असे असूनही संभाव्य आजारांना रोखण्यासाठी कोणीही आपल्या बहुमोल आरोग्याची तपासणी करीत नाही. परिणामी वणी उपविभागातील अनेकांना अचानक ह्या जगाचा निरोपही घेण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे दिसते. ह्या अघटीत घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शरीराची तज्ञांकडून योग्य आरोग्य तपासणी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी (चंद्रपूर-वणी-आर्णी) चे नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनाने तसेच वणी विधानसभेचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या विशेष नेतृत्त्वात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांनी “मोफत महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन सोमवार (ता.९ सप्टें) रोजी मुकुटबन येथील “कृषी उत्पन्न बाजार समिती” येथे दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
ब्लडप्रेशर, ब्लड शुगर, ईसीजी ,रक्त तपासणी, बि.एम.डब्ल्यु,आणि सर्व आरोग्य मेडिकल मोफत तपासणी, महिलांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी, सर्वरोग निदान तपासणी व तज्ञ डॉक्टराचे मार्गदर्शन ह्या शिबिरात मिळणार आहे. हृदयरोगतज्ञ,स्त्रीरोगतज्ञ व प्रसुतिशास्त्र तज्ञ (Multi-specialist) या महाआरोग्य शिबिरात सहभागी होऊन रुग्णांना सेवा देणार आहेत व प्राथमिक औषधीचे वितरण ही करण्यात येणार आहे.यातील गंभीर रुग्णांना महाआरोग्य शिबिरात दाखल करण्यात येऊन त्यांच्या मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया केली जाणार आहे.आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सतर्क राहून योग्य वेळी तपासणी आणि उपचार घेतल्यास दुर्धर आजारांना आपण दुर ठेवू शकतो. म्हणून सर्वांनी ह्या मोफत महाआरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. महेंद्र लोढा (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,सदस्य) यांनी केले आहे.
•असा असेल डॉ. महेंद्र लोढा (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,सदस्य) यांचे “मोफत महाआरोग्य शिबिर….”
•सोमवारी (ता.9) मुकुटबन येथे आरोग्य तपासणी •शनिवार (ता .14)मारेगाव येथील लोढा हॉस्पीटल मध्ये रविवार •(ता.15) वणी येथील लोढा हॉस्पीटल मध्ये •रुग्णांची तपासणी व्यवस्था •स्पेशालिस्ट अनेक डॉक्टर्सचा महाशिबिरात सहभाग •तात्काळ निदान झाल्यास मोफत उपचार व शस्त्रक्रिया •प्लॅन सर्जरी असल्यास मोफत शस्त्रक्रिया •स्थानिक स्तरावर नावनोंदणी सुरू •प्राथमिक औषधांचा साठा उपलब्ध •औषध वितरण व्यवस्थेसाठी स्टॉल्स उपलब्ध • डॉक्टर्स, परिचारिका, फार्मासिस्ट आशा कर्मचाऱ्यांचा सहभाग.
” वणी विधानसभेचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात होणाऱ्या महाआरोग्य शिबिरात रुग्णांची आरोग्य तपासणी करून उपचार केले जातील. वेळप्रसंगी मोफत शस्त्रक्रियाही केल्या जातील. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आहे. – डॉ. महेंद्र लोढा (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,सदस्य)