अजय कंडेवार,Wani:- यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा २२ जून रोजी शेतकरी मंदिरात वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भव्य सत्कार समारंभ घेण्यात आला.
नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषीत झाला .त्यात काँग्रेसला घवघवीत यश मिळाले.काँग्रेसच्या आगामी वाटचालीवर लोकसभेच्या निकालाने पुन्हा राज्यात काँग्रेसची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात अव्वल क्रमांकावर असलेला पक्ष म्हणुनही उदयास आलेला आहे. यामुळें येत्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने जिल्हा पातळीवर संघटनात्मक बांधणीवर भर दिले. म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड.मानकर यांनी जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. त्यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रात नवनियुक्त 3 उपाध्यक्ष,6 सरचिटणीस,13 चिटणीस म्हणून निवड करण्यात आली.
या सत्कार कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नवनिर्वाचित खा.प्रतिभाताई धानोरकर , अध्यक्षस्थानी माजी आ. वामनराव कासावार होतें.प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर यांची विशेष उपस्थिती होती तसेच नरेंद्र ठाकरे, संजय खाडे,जिल्हा मध्यवर्ती बँक चे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, राजीव कासावार ,संध्या बोबडे,डॉ.महेंद्र लोढा,जय आबड,मारोती गौरकार, ऍड.देविदास काळे ,राहुल दांडेकर,शंकर मडावी,मंदा बांगरे,अल्का महाकुलकर तसेच सर्व मान्यवर ,सत्कारमूर्ती व वणी विधानसभा क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन घनश्याम पावडे यांनी केले ,प्रास्ताविक रवि धानोरकर तर आभार अंकुश माफुर केलें.