VIdharbh News -अजय कंडेवार,Wani:- भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदारसंघातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट दिल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर युवक समर्थक सध्या नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे.लोकसभा निवडणुकीत अहीर व त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात येत्या काळात दिसून येईलच यात मात्र शंका नाही. कारण लोकसभेचा निकाल कोणाचा बाजूला येईल यावर “भैया” समर्थकांची “नाराजी ” की ,”के पक्ष के लिये सब कुछ राजी ” ही खरी अग्नीपरिक्षा येणाऱ्या काळात दिसेलच.
तसेच भैया समर्थक बरोबरच घटक पक्षाचे पदाधिकारी हे निरुत्साही असल्याचे बघायला मिळत आहे. राजकिय पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व उमेदवारांनी घटक पक्षांच्या पदाधिकारी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे घटक पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे.
सध्याची परिस्थिती बघता पदाधिकारी व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अजून संचारला नाही वातावरण निर्मिती व विजयाच्या तोऱ्यात असलेल्या उमेदवारांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना ही बाब घातक ठरेल असे सध्या बोलल्या जात आहे. निवडणुकीची खरी रणधुमाळी अजून सुरू झाली नसून चार तारखेनंतर प्रत्येक उमेदवारांचे खऱ्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. यात नेमका कोण कोणासोबत आणि “भैया”समर्थक किती ? आणि”भाऊ “चा पाठीशी किती? हे येणारा काळ नक्कीच सांगेल. परंतु असे जर भाऊंचा गेम झाल्यास प्रतिभाताई शुअर(Sure ) असे जानकरांकडून बोलल्या जात आहे.