अजय कंडेवार,वणी: State Board result class 10th वर्ष 2024 ला वर्ग 10 वी चा निकाल 27 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर झाला, झरी तालुक्यात मुकुटबन येथील आदर्श शाळेचा निकालात कायर येथील राकेश विठ्ठल शंकावार यांची मुलगी “वर्षा ” व नरेश विठ्ठल शंकावार ” दिव्या” या दोन्ही विद्यार्थिनीनी क्रमशः 71.80 टक्के व 66.40 टक्के गुण घेत दहावीचा परीक्षेत प्रथम श्रेणीत येत शाळेतून चवथा येण्याचा मान पटकाविला आहे.
वर्षा व दिव्या या दोन्हीं बहिणींनी विज्ञान अतिशय चांगले गुण मिळवून तसेच सामाजिक विज्ञान आणि विज्ञानामध्ये ही चांगले गुण मिळवून प्रशंसनीय कामगिरी साध्य केली आहे.आदर्श शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना,”दिव्या व वर्षा”ने तिच्या शिक्षकांकडून मिळालेल्या अमूल्य मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे कौतुक केले. त्या दोघांनी शाळेचा संपूर्ण अभ्यास साहित्य आणि कठोर प्रशिक्षण पुरविल्याबद्दल श्रेय दिले, ज्यामुळे त्यांना कठीण संकल्पना प्रभावीपणे समजून घेता आल्या. या यशाचे श्रेय शिक्षक, आई व वडिलांना दिले आहे.