अजय कंडेवार,वणी – यील्डबेस पीकविम्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ रक्कम जमा करावी व बि-बियाणे, खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्याची मागणीकरीता कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेस नेते संजय खाडे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले.Congress leader Sanjay Khade hit the tehsil for various demands of farmers.
सन 2022-23 या शेतीच्या हंगामाचा यील्डबेस पीकविमा सरसकट मंजूर झाला आहे. मात्र काही शेतकरी अद्याप लाभापासून वंचित आहे. तसेच सन 2023-24 या हंगामात तालुक्यातील अनेक शेतक-यांना पीकविम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. शिवाय ज्या शेतक-यांना पीकविम्याची रक्कम मिळाली आहे ती अत्यल्प आहे. त्यामुळे पीकविम्याची रक्कम तात्काळ जमा करावी. तसेच किती शेतकरी अद्याप लाभापासून वंचित आहे. किती शेतकरी प्रोसेसमध्ये आहे. याची यादी जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
” बी-बियाणे व खतांच्या किमती कमी करा,अवघ्या काही दिवसात शेतीचा नवीन हंगाम सुरु होणार आहे. मात्र सध्या बी-बियाणे व खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. गेल्या हंगामात सातत्याने ओला व कोरडा दुष्काळ, गारपीट याचा उत्पादनावर परिणाम झाला. तसेच गेल्या हंगामात शेतमालाला अत्यल्प दर मिळाला. त्यामुळे बी-बियाणे व खतांच्या किमती कमी करा, अशी मागणी संजय खाडे यांनी केली आहे. “
निवेदन देतेवेळी प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, राजाभाऊ पाथ्रडकर, विवेक मांडवकर, तेजराज बोढे, संदीप ढेंगळे, अक्षय कुचनकर,आकाश टेकाम, उमेश कोसारकर, सिताराम झाडे, वेदांत चाफले, विजय ढेंगळे, अरुण नागपुरे, प्रतिक गेडाम, अनुराग गायकवाड, अनिकेत गंधारे, कैलास पचारे, भारत डंभारे, मनोज भगत, भास्कर वासेकर, यादव आसुटकर, विकेश पानघाटे, ईश्वर खाडे, अशोक पांडे, अरुण चटप, काजल शेख, करण आसुटकर, गणपत कोसारकर, शालिक काथवटे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.