अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील मोहदा (क्रेशर)येथे एक मुलगी अल्पवयीन असतांनाही विवाह होत असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने वणी येथील सामाजिक कार्यकर्ता प्रिया नाकाडे यांना दिली. त्यावरून त्यांनी येथे जाऊन संबंधित कुटुंबाची माहिती मिळवून त्याबाबत खात्री केली आणि बालविवाह रोखण्यात २५ ऑगस्ट रोजी यश प्राप्त झाले.Child marriage was prevented with the help of social activist Priya Nakade.
वणी येथील सामाजिक कार्यकर्ता प्रिया नाकाडे हे मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. असे-अनेक कार्य त्यांनी केल्याचा जणू पाढाच वाचाल तरीही कमीच आहे.तसेच अनेक बालविवाह देखील त्यांनी स्वतः पुढाकार घेत रोखले आहे.अश्यातच एक घटना तालुक्यातील मोहदा (क्रेशर)येथे बालविवाह होत असल्याची कुण-कुण या सामाजिक कार्यकर्तीला लागताच तीने गाव प्रशासन व कांहीं स्थानिकांसह अल्पवयीन मुलीचा कुटुंबीयांची घरी थेट भेट घेतली. त्या मुलीच्या आई-वडिलांना समुपदेशन करण्यात आले.जर अल्पवयात लग्न केल्यास होणारे दुष्परिणामही समजावून सांगण्यात आले तसेच कायदेशीर कारवाईबाबत माहिती देऊन लग्न रोखण्यात यश मिळविले. वर पक्षाला ही माहिती दिली असता, लग्न झाल्यास त्यावर कायदेशीर कारवाईची तंबी दिल्याने शेवटी वर पक्षही नरमला व पालकांकडून हमीपत्र भरून देण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ता प्रिया नाकाडे, उपसरपंच,ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
” बालविवाह झाल्यास कायद्यानुसार शिक्षेची तरतूद आहे. मंगल कार्यालय मालकांनी, तसेच पालकांनी आधार कार्ड, तसेच जन्मतारखेचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शाळेतील जन्मनोंद या कागदपत्रांचा आधार घेऊन वयाची खात्री करावी. आपल्या आसपास बालविवाह होत असल्यास त्वरित चाइल्ड हेल्प लाइन नंबर १०९८, पोलिस हेल्पलाइन नंबर ११२ किंवा पोलिस अधिकारी यांना माहिती देऊन मदत करावी, अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन प्रिया नाकाडे यांनी केले आहे.”