विदर्भ न्यूज डेस्क, वणी:- दरवर्षी घेण्यात येत असलेल्या जागतीक महिला दिनाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमाची मेजवाणी मारेगांव करांसाठी एक आनंदाची पर्वणी ठरते, त्यात समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना मैत्री कट्टा मारेगांवच्या वतीनेसन्मान सुद्धा घेण्यात येत असतो.असेच कला क्षेत्रातील भरीव कामगिरी करणारे तालुक्यातील डॉक्टरेट बहाल करण्यात आलेले डॉ.विनोदकुमार आदे यांचा सन्मान चिन्ह देऊन आयोजन समितीकडून सन्मान करण्यात आला Dr. Ade felicitated in Maregaon.
या समारंभात वरोरा -भद्रावती विधानसभा आमदार प्रतिभा धानोरकर,संजय खाडे, अरुणा खंडाळकर काॅग्रेस कॅमेटीचे तालुकाध्यक्ष मारोती गौरकार, खंडाळकर, दिदि तोटावर, थारांगाना तेलंग ,शंकरराव व्हराटे,पुरुषोत्तम आवारी,रवि धानोरकर,नंदेश्वर आसुटकर,अंकुश माफुर आदि उपस्थित होते.