अजय कंडेवार,वणी:- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून भाजपाचा उमेदवार कोण ? याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यासह बहुजन समाजाचा ओबीसी चेहरा डॉ.अशोक जीवतोडे यांच्या नावाची चर्चा भाजपाचे वर्तुळातही होती. भाजपाने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून बहुजन ओबीसी उमेदवार दिला तर काँग्रेसचे पानिपत सहज शक्य असल्याची अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण शेवटी “भाऊ की भैया “हा तिळा सुटला.
2019 मध्ये भाजपाचे हंसराज अहीर यांचा काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी 44 हजार मतांनी पराभव केला होता. हा पराभव जिव्हारी लागल्याने अहीर पराभवाच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक मतदार संघ पिंजून काढत होते.
अखेरचा दिवसापर्यंत उमेदवारीसाठी दिल्लीत ठाण मांडून बसलेही होतें परंतु पक्षश्रेष्ठींनी सुधीर मुनगंटीवार या भाजप उमेदवारीच्या गळ्यात माळ टाकत याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.विशेषतः म्हणजे आज घडीला निवडणुकीसाठी मुनगंटीवार सर्वच दृष्टीने तयार झाले होते कारण मुनगंटीवार यांनी वणी, पांढरकवडा व केळापूर येथे दिल्लीवारीनंतर मोठे कार्यक्रम घेतले. भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक लावले. या भागात त्यांचा सतत संपर्क बघता मुनगंटीवार तयारीत असल्याचे दिसून आलें होतें. आणि आज रोजी त्यांचा नावाचेशिक्कामोर्तब झाले.