•उडता त्रिशूल व शिवतांडव हे यात्रेचे प्रमुख आकर्षण होते.
अजय कंडेवार,वणी:- माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या संकल्पनेतून २५१ किलोंचा त्रिशूल खांद्यावर घेऊन हजारो भाविकांसह वणी ते शिरपूर अशी पदयात्रा काढण्यात आली. केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी चारगाव चौकीवर येऊन सर्व भाविकांची भेट घेऊन यात्रेत सहभागी झाले. आ. बोदकुरवार सुद्धा या यात्रेत सहभागी झाले होते.12/3/24 Grand “Trishul Yatra” walk started in Wani
गेल्या वर्षापासून वणी ते शिरपूर अशी त्रिशूल यात्रा काढली जात आहे. यावर्षी उडता त्रिशूल व दिल्ली येथील शिवतांडव हे यात्रेचे प्रमुख आकर्षण होते. शिवाय स्थानिक कलावंतांनी सुद्धा आपल्या कलेचे प्रदर्शन केले. या त्रिशूल यात्रेत सहभागी भाविकांसाठी अभिषेक करण्यासाठी वाराणसी येथून आणलेले पवित्र गंगाजल उपलब्ध करून दिले गेले. शहरातील हजारो शिवभक्त व वणी ते शिरपूर मार्गावरील गावातील भाविक सहभागी झाले होते. मोटरस्टँड जवळील हनुमान मंदिरातून निघालेली ही भव्य रॅली टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, भगतसिंग चौक, रंगनाथस्वामी मंदिर, गोकुळनगर, लालगुडा चौपाटी ते शिरपूर पर्यंत पोहोचली .
या यात्रेच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प्रशांत भालेराव, गजानन कासावार, नीलेश परगंटीवार, कुणाल चोरडिया, अनिल अक्केवार, बंडू चांदेकर, नीलेश पोल्हे, जयेश चोरडिया, मनीष गायकवाड, सारंग बिहारी, निखिल खाडे, गुंजन इंगोले, शरद ढुमणे, सुभाष बिलोरिया, अनिल रेभे, मंगेश झाडे, किशोर बावने सह शिवभक्तांनी परिश्रम घेतले.