अजय कंडेवार,Wani:- हल्ली दिवाळीची चाहूल लागली. महाविद्यालयीन तरुण-तरुणी, पालक पर्यटनाचा, तर शाळकरी मुलांचे पालकांनी मामाच्या गावी जाण्याचा बेत आखण्यास सुरुवात केली.
सरकारी नोकर, दुकानदार दिवाळीचे पाच ते सहा दिवस सुट्यांचा आनंद घेत असल्याने या काळात घरे बंद करून बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. वर्षभरापेक्षा सर्वाधिक चोरी-घरफोडी आणि दरोड्याचे गुन्हे दिवाळीच्या सुट्यांमध्ये घडतात. दिवाळी हा सण सूरू झाला असून दिवाळीपूर्वी टेहळणी करण्यासाठी चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. (diwali festival precautions Wani news)
🛑या बाबींची घ्यावयाची काळजी……
० अपार्टमेंट-सोसायटीत ‘नाईट व्हिजन’ कॅमेरे कार्यान्वित करावेत
० घराबाहेर रात्री पुरेशा उजेडाची सोय करावी. दिवे रात्री सुरू ठेवावेत
० चार ते दोन कुटुंब बाहेरगावी जात असल्यास वॉचमन ठेवावा
० वॉचमनजवळ शिट्टी आणि काठी द्यावी. त्याचा वापर करण्यास सांगावे
० जवळच्या पोलीस ठाण्याचा संपर्क क्रमांक वॉचमनसाठी भिंतीवर लिहावा
० घराच्या मुख्य दाराच्या कड्यांची मजबुती तपासून घ्यावी
० लोखंडी ग्रीलचे ‘सेफ्टी डोअर’ असले तरी त्याला वायर लॉक लावावे
० बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी.
० घरातील रोख रक्कम, दागिने लॉकरमध्ये ठेवावेत
“शहरातील सर्व अट्टल गुन्हेगार, ‘रेकॉर्ड’वरील चोरटे पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात आहेत. बहुतांश हद्दपार करण्यात आले आहेत. आगामी सुट्यांच्या काळात पोलीस गस्त वाढवण्यात येणार आहेत. नागरिकांनी बाहेरगावी जाताना विशेष काळजी घेत रोकड, दागिने बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावेत. पोलीस नियंत्रण कक्षात २४ तासासाठी ११२ हा क्रमांक उपलब्ध असून अप्रिय घटनाप्रसंगी पोलीस आपल्या मदतीला तत्परतेने हजर आहे.” – अनिल बेहरानी (पोलीस निरीक्षक,वणी पोलीस स्टेशन)