अजय कंडेवार,वणी:- प्रत्येक छोटी मोठी निवडणुक म्हटले कि ,राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांच्या वतीने आपल्या मतदार संघात कोणत्या जातीचे किती प्रमाणात मते आहे, याची चाचपाणी करण्यासह कोणत्या समाजात कोणता समाज नेता वरचढ आहे .लोकसभा निवडणुकीचा जाहिर प्रचार सुरु झाला आहे. लढतीतील प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांची एन्ट्री झालेली नाही. मात्र उमेदवारांचे अतिविश्वासु तथा नातेवाईक मतदार संघात घिरट्या घालतांना दिसुन येत आहे.
काही उमेदवारांचे नातेवाईक व प्रमुख कार्यकर्ते स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना सोबत न घेता आपल्या स्तरावर विविध समाजाच्या नेत्यांच्या भेटी घेण्यावर भर देत असल्याचे दिसुन येत आहे. निवडणुकीमध्ये उमेदवाराकडुन आर्थीक फायदा करवुन घेण्याकरीता त्या त्या समाजाचे, समाजाच्या नावावर आपली राजकीय व आर्थीक दुकानदारी करणारे स्वयंभु नेते पुढे येवु लागल्याचेही दिसुन येत आहे. याची सुध्दा अद्यावत माहिती घेण्यावर भर देण्यात येत असतो. शिवाय अनेक समाजाचे स्वयंभु नेते मिच समाजाचा मोठा नेता म्हणुन समोर येण्याचा प्रयत्न करीत असते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुध्दा अशा समाज नेत्यांचे पिक तालुक्यात आल्याचे दिसुन येत आहे.