अजय कंडेवार,वणी:- नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेवुन वणी तालुक्याच्या ठिकाणी व चंद्रपुर जिल्ह्यांच्या ठिकाणी विविध शैक्षणिक वर्षे २०२४-२०२५ व इतर सुविधाचा लाभ विद्यार्थी व नागरीकांना होण्याच्या दृष्टिने तसेच महामंडळाचे उत्पन्न वाढीस मदत होईल करीता नव्याने मा. जि. प. सदस्य विजय पिदुरकर यांनी वणी भालर मार्गे बेलोरा घुग्घुस बस सेवा सुरु करण्याकरीता आगार व्यवस्थापक रा.प.मं., वणी मार्फत विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ, यवतमाळ यांना निवेदन 13 मार्च रोजी देण्यात आलें
वणी तालुक्यातील वणी भालर मार्गे बेलोरा राज्य मार्ग घुग्घुस हा रस्ता अत्यंत महत्वाचा असुन या रस्त्यावर लालगुडा, धोपटाळा, भालर, लाठी, बेसा, निवली, सुंदरनगर, तरोडा, निलजई, बेलोरा, इत्यादी गावे येत असुन या गावातील नागरीक, विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरीक, छोटे व्यवसाहीक व दैनदिन प्रवासी या करीता सार्वजनिक वाहतुक व्यवस्था नसल्याने येथील नागरीकांना वणी बाजरपेठ, घुग्यूस, चंद्रपूर येथे प्रशासकिय कामे शैक्षणिक कार्य व दैनदिन व्यवहारास ये-जा करणे सध्य स्थितीत खाजगी वाहतुकीने करावी लागते याचा परिणाम त्यांचे कामकाज व विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. या रस्त्यादरम्यान सुंदरनगर तरोडा येथे इंग्रजी माध्यमाची शाळा भालर येथे हायस्कुल या ठिकाणी जाण्यास विद्यार्थ्यांवर खाजगी वाहणामुळे जास्तीचा आर्थिक भार पडतो सोबतच वणी घुग्घुस चंद्रपूर येथे महाविद्यालयीन, नर्सिंग, तांत्रिक या ठिकाणी बससेवा नसल्याने भाड्यांच्या खोलित राहुन शिक्षण घ्यावे लागत आहे राज्य परिवहन मंडळाचे प्रवाश्यांच्या सेवेसाठी हे ब्रिदवाक्य असुन याचा लाभ या रस्त्यावरील नागरीकांना होत नाही. हा परिसर कोळसा खनिजाने संपन्न असुन शासनाने सार्वजनिक वाहतुकीमध्ये विद्यार्थी, दिव्यांग, महिला जेष्ठ नागरीक इत्यादी करीता विविध प्रवास सवलत जाहीर केल्या परंतु या मार्गावरुन बससेवा नसल्याने नागरीकांना शासनाच्या या सुविधांचा फायदा होत नाही.
त्याकरिता नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेवुन वणी तालुक्याच्या ठिकाणी व चंद्रपुर जिल्ह्यांच्या ठिकाणी विविध शैक्षणिक वर्षे २०२४-२०२५ व इतर सुविधाचा लाभ विद्यार्थी व नागरीकांना होण्याच्या दृष्टिने तसेच महामंडळाचे उत्पन्न वाढीस मदत होईल करीता नव्याने बससेवा सुरु करण्याकरीता या रस्त्याचा वाहतुक सर्वे करुन नागरीकांना सार्वजनिक परिवहन सेवेचा लाभ होण्या करीता बससेवा सुरु करा अशी मागणी माजी जि. प. सदस्य विजय पिदुरकर यांनी केली आहे.