• शेकडो विद्यार्थी व नागरिक झाले भावूक..!
अजय कंडेवार,वणी:- एखाद्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची ,कर्मचाऱ्यांना कुटुंब समजणाऱ्या अधिकाऱ्याची जेव्हा बदली होते तेव्हा वणी शहरातील नागरीक व विद्यार्थीही कसे भावूक होतात.याचा प्रत्यय वणी शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये दिसुन आले. वणी येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांची अमरावती परिक्षेत्रातील अकोला येथे करण्यात आल्याने त्यांचा भव्य वाढदिवस व निरोप समारंभ तां.१ फेब्रु.रोजी स्वामी विवेकानंद अभ्यासगट वणी येथे उमेश पोद्दार मित्रपरिवार तर्फे सायं.७ वाजता आयोजित करण्यात आला .
•वणी येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांचे मनोगत व्यक्त करतांना...
वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विहित निकषानुसार बदली करण्यात आली आहे. १ फेब्रू २०२४रोजी शहरातील स्वामी विवेकानंद अभ्यासगट येथे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश कींद्रे व पारसमल प्रेमराज ज्वेलर्स चे संचालक विजय चोरडिया व कार्यक्रमाचे आयोजक उमेश पोद्दार यांच्या विशेष उपस्थितीत वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांचा वाढदिवस भव्य स्वरूपात केक कापून साजरा करीत निरोप समारंभही थाटात पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थिती पाहूणे ,नागरीक व अभ्यासगटाचे शेकडो विद्यार्थी हे सारेच भावूक झाले होते, काहींनी तर अक्षरशः रडून त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व सत्कारमूर्ती म्हणुन वणी ठाणेदार पी.आय अजित जाधव, प्रमुख मार्गदर्शक उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व प्रमुख अतिथी म्हणुन पारसमल प्रेमराज ज्वेलर्स चे संचालक विजय चोरडिया व सपोनी माधव शिंदे हे होते.यावेळी पोलीस निरीक्षक जाधव यांना विजय चोरडिया व उमेश पोद्दार तसेच स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थ्यांकडून पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.फुलांचा वर्षाव करत साहेबांचा वाढदिवस साजरा केला व त्यांना भावुक निरोपही देण्यात आला. प्रत्येकाने या व्यक्तिमत्वाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. त्यात अनेकांना आपल्यातून कोणीतरी जिव्हाळ्याचा माणूस जातोय त्यामुळे काहींचे अश्रू अनावर झाल्याचे पहावयास मिळाले.आयोजक उमेश पोद्दार यांनीही बोलतांना व्यक्त केलें की, “साहेब जेव्हा ही तुम्ही वणी शहरात याल तर नक्कीच मला आठवण कराल” यांनीही अभ्यासगटाचा प्रत्येकी विद्यार्थांना पुस्तके देण्याचा निश्चय केला.
सत्काराला उत्तर देताना पी.आय अजित जाधव यांनी विविध अंगी असलेल्या गुणांची माहिती सांगितली.नवीन पिढीला पोलीस खात्यामध्ये घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी बोलताना सांगितले. सदैव मी आपला ऋणी राहील, कोणत्याही कायदेशीर बाबींची अडीअडचण आल्यास त्यांनी बिनधास्तपणे माझ्याशी संपर्क करावा असेही ते बोलतांना म्हणाले. तसेच या कार्यक्रमात अभ्यासगटाला 20 हजार रु.पुस्तके देऊ करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिले”
यावेळी एएसआय शेखर वांढरे, ज्ञानेश्वर आत्राम, जमादार इकबाल शेख ,उमेश पोद्दार, पत्रकार अजय कंडेवार, राजू रींगोले, शुभम अग्रवाल यासह अभ्यासगटाचे शेकडो विदयार्थी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी अमोल क्षिरसागर व अभ्यसागटाचा समस्त कमिटी सदस्यांनी केली व कार्यक्रमाची सागता स्वरूची भोजनाने करण्यात आली.