Thursday, April 30, 2026
HomeवणीP.I अजित जाधव यांनी "रॉयल ठाणेदार"म्हणून चांगलीच छाप सोडली.....!

P.I अजित जाधव यांनी “रॉयल ठाणेदार”म्हणून चांगलीच छाप सोडली…..!

•परिवारातील “एक सदस्य “म्हणूनच कर्मचाऱ्यांशी वागणुक ठेवली

•कामगिरीचा विशेष लेख…..

अजय कंडेवार,वणी:- केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विहित निकषानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात असे पोलीस महासंचालक यांना सुचवले होते. त्यानुसार वणी येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांची बदली अमरावती परिक्षेत्रातील अकोला येथे झाल्याने वणी पोलीस स्टेशनचे नवीन शिलेदार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेषतः पोलीस प्रशासनात अलीकडे सिंघम, दबंग आणि रावडी राठोड प्रमाणे केवळ स्टाईल मारून चमकोगिरी करण्याचा जणू एक ट्रेंडच आला आहे. अर्थात, अशा अधिकाऱ्यांची काही कमी नाही. परंतु, महाराष्ट्र पोलीस दलाचे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद प्रमाण मानून पोलीस दलात अधिकारी म्हणून भरती झालेले पोलीस निरीक्षक अजित जाधव हे अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर आणि सर्वसामान्यांच्या परिस्थितीची, अडीअडचणीची आणि त्यांच्या मानसिकतेची जाण असलेले एक जबाबदार पोलीस अधिकारी आहेत.त्यांच्यापर्यंत कसलीही तक्रार घेऊन आलेला व्यक्ती आजपर्यंत कधीही हातास, निराश होऊन परत जात नाही. या जनतेच्या बोलक्या प्रतिक्रियाच त्यांच्या कार्याची खरी पोचपावती आहे. कोणत्याही बातमीला अल्पावधीत प्रतिसाद देणारे, कसल्याही गुन्ह्याचा गुंता लीलया सोडवून त्याचा छडा लावणे, ते अगदी अट्टल गुन्हेगारांनाही वठणीवर आणणारे पोलीस अधिकारी, अशीही P.I अजित जाधव यांची ओळख आहे.

पीआय अजित जाधव अतिशय शांत, हसमुख, मनमिळावू शिस्तप्रिय,सुस्वभावी, कुणाच्याही दबावाला बळी न पडणारे अधिकारी म्हणून त्यांची वणी उपविभागात ओळख होती.मध्यंतरी वणी शहरात घरफोडी, दुकानफोडी व चोऱ्यांचे सत्र सुरु झाले होते. शहरात अज्ञात चोरट्यानी एकाच रात्री जवळपास अनेक दुकाने फोडली होती.त्यामुळे शहरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली होती.अश्यातच पी.आय अजित जाधव यांची वणी ठाण्यात बदली होताच चोरीच्या घटनांत व अनेक गुन्हे मोठ्या प्रमाणात अंकुश लागला होता.अजित जाधव शांत स्वभावाचे व रॉयल ठाणेदार म्हणून चांगलीच छाप सोडली आहे व अवैध धंदे,चोऱ्या व गुन्हे यावर मोठ्या प्रमाणात आवरही घातला.पीआय अजित जाधव यांनी कर्मचारी यांना आपल्या परिवारातील “एक सदस्य ” म्हणूनच त्यांच्याशी वागणुक ठेवली हे विशेष… काही दिवसातच आपले बनलेले अधिकारी यांचा बदलीने ठाण्यातही भावूकता दिसून आली. अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याशी कसे वागावे ? असाही धडा त्यांनी शिकवला असेही म्हणायला काहीच हरकत नाहीं. अश्यातच जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांना जिल्हा बदलीचे आदेश धडकल्याने कर्मचारी यांना देखील शॉकच बसला.मात्र बदलीचे आदेश आल्याने त्यांचे कार्य अपूर्ण राहीले. बदलीचे आदेश नसते तर अजित जाधव हे त्यांचा सेवेचा कालावधी नक्कीच पुर्ण केला असता यात तीळमात्र शंका नव्हतीच….

पी.आय अजित जाधव यांची उत्कृष्ठ कामगिरी….

यवतमाळ येथे गून्हे परिषदमध्ये मागील महिन्यात विविध हेडखाली सर्वात चांगली कामगिरी करणारे पोलीस स्टेशन यांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.अवैध धंदे,चोऱ्या व गुन्हे यावर मोठ्या प्रमाणात आवर घातला. मोठ-मोठे चोरीचे गुन्हे उघड केलें.अनेक धडाकेबाज कारवाया केल्या. अनेक मोठ मोठ्या गुन्हातील आरोपींचा मुसक्या दाबल्या व अनेक आरोपींना जेरबंद केले.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page