Tuesday, April 28, 2026
HomeBreaking Newsवणी विधानसभेत 'वंचित'च्या उमेदवारीसाठी "ट्विस्ट...."

वणी विधानसभेत ‘वंचित’च्या उमेदवारीसाठी “ट्विस्ट….”

•SC उमेदवारच देण्यात यावा,यासाठी पदाधिकाऱ्यांची विशेष मागणी. •नाही तर....वंचित’ आघाडीची मतांची टक्केवारी निम्म्यावर.?

अजय कंडेवार,Wani:- दलित, अल्पसंख्यांक व आलुते-बलुतेदारांचा पक्ष असल्याची शेखी मिरवणाऱ्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’ला लोकसभा निवडणुकीत जबर फटका बसला होता. आता वणी विधानसभेतूनही अश्याच एका प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे ? वंचित’ आघाडीची मतांची टक्केवारी निम्म्यावर.? अशी परिस्थीती सध्या निर्माण झाली आहे. कारण उमेदवारी निवडीतून पक्षश्रेष्ठी कडे पदाधिकारीच नाराज असल्याची खमंग चर्चा दबक्या आवाजातून येत आहे.

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहे. आणि तिकीटाबाबत यादी प्रसिद्ध होण्याची संकेत जोरदार असतानाही महाविकास ,महायुती व वंचित बहुजन आघाडी अशी टस्सल होणार हेसुद्धा निश्चित आहे. मात्र या तीन्ही पक्षांचे उमेदवार कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजपाकडून अद्यापही उमेदवारी जवळपास निश्चित झाली नाहीं. मात्र काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रांगा लागल्या आहेत. त्याचप्रमाणे इतरही इच्छुकांनी विधानसभेसाठी सोशलमीडियासह बॅनरबाजीतून धडपड चालविली आहे. परंतु सद्यास्थिती पाहता “वंचित बहुजन आघाडीत” तीन नावाची चर्चा जोरदार सूरू आहे. त्यात अव्वल असलेले हरीश पाते, दुसऱ्या क्रमांकावर राजू निमसटकर तर तिसऱ्या क्रमांकावर सुधाकर चांदेकर आहे.परंतु एका सर्वेमधून समोर आले की,SC उमेदवाराला अधिक पसंती दर्शविली आहे. परंतु पक्षश्रेष्ठी कोणता उमेदवार जाहीर करतात याकडे सध्या लक्ष लागले आहे.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page