Tuesday, March 3, 2026
HomeBreaking Newsगळ्यात आणि पोटात वार अन् आतड्या बाहेर....!

गळ्यात आणि पोटात वार अन् आतड्या बाहेर….!

•जखमीची प्रकृती चिंताजनक

विदर्भ न्यूज डेस्क,वणी :-माजरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटाळा येथील २४ वर्षीय तरुणाला वणी वरोरा जुना रस्ता वर्धा नदी जगन्नाथ मंदिराजवळ बोलावून त्याच्या गळ्यात व पोटात चाकूने (धारदार शस्त्राने) वार करून हल्लेखोर पळून गेला. जुन्या वादाचा वचपा घेण्यासाठी धारदार शस्त्राने हल्ला केला असे सांगण्यात येत आहे. जखमी तरुण तिथेच पडला. जखमी तरुणाचे नाव धीरज घानवडे, वय २४, रा. पाटाळा( जुनीवस्ती), जिल्हा चंद्रपूर असे जखमीचे नाव आहे.

माजरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सारंग मिराशी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी धीरज घानवडे याचा मावस भाऊ सतीश बोधणे यांनी दिलेल्या तक्रारी वरून शुक्रवारी रात्री९.१५ च्या दरम्यान धीरजवर हल्ला करण्यात आला. सतीश बोधने तात्काळ घटनास्थळ गाठून जखमी व्यक्तीला तातडीने वेकोली माजरी येथील रुग्णवाहिकेतून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले.  मात्र धारदार जखमेचे गांभीर्य, घशातून व पोटातून अत्याधिक रक्त वाहत असल्याने व पोटातल्या आतड्या बाहेर व अतिरक्तस्राव होत असल्याने त्याला तातडीने चंद्रपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.  माहिती नुसार धीरज घानोडे हा घरीच होता.त्याच्या मोबाईलवर वेदांत हिकरे, रा.राजूर कॉलरी तालुका, वणी जिल्हा यवतमाळ यांचा फोन आला की,  राळेगाव फाटा जगन्नाथ मंदिराजवळील पुलाखाली येण्यास सांगितले.वेदांत हीकरे व त्याचा मित्र प्रज्वल शेंडे तिथे पहिलेच पोहोचले होते . वेदांत हिकरे याने त्याचा मित्र प्रज्वल शेंडे याला खर्रा आणण्यास सांगितल्यानंतर तो त्या स्थळावरून खर्रा आणण्यास निघाला तेव्हढ्यातच धीरज घानवडे याच्या मानेवर व पोटात धारदार धारदार शस्त्राने सपासप वार करून घटनास्थळवरुन पळ काढला.

•माजरी पोलिसांनी हल्लेखोर आरोपीला केली अटक

माजरी पोलिसांना याची माहिती मिळताच, माजरी पोलिसांनी तीन-चार पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केले,आरोपी राजूर कॉलरी, तालुका-वणी,जिल्हा-यवतमाळ येथे लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून हल्लेखोर आरोपी वेदांत हिकरे, वय २२ रा. राजूर कॉलरी येथून अटक केले आहे”.

 •जखमीची प्रकृती चिंताजनक…..

जखमी धीरजला चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला खासगी रुग्णालयात डॉ.मानवटकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या पोटावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून आणखी दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतील.  जखमींची प्रकृती चिंताजनक आहे”वरोरा Dysp  नयोमी साटम घटनास्थळी पोहोचले,याशिवाय चंद्रपूर येथून फॉरेन्सिक लॅब आणि फिंगर प्रिंट तज्ञांनाही पाचारण करण्यात आले.वरोरा पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी ठाणेदार सारंग मिराशी व चमू तपास करत आहेत.

•गावात अत्यंत साध्या स्वभावाची पार्श्वभूमी असणारा  होतकरू “वेदांत” परंतु……..

राजूर गावातील अत्यंत साध्या स्वभावाचा मुलगा म्हणूनही विशेष ओळख आणि एकुलता एक असल्याने वडिलांना कामात आधारही होता.परंतु अस काय घडलंय की वेदांतला असे कृत्य करण्यास का भाग पडले. कारण अश्या कृत्याने घरच्यांना विश्वास देखील बसेना .त्याने आजपर्यंत असे विचार देखील केले नाही आणि जीवनात अशी मोठी चूक होण्यामागे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page