अजय कंडेवार,Wani:– लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच रणधुमाळी पाहायला मिळत आहे. उमेदवारांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू झाला आहे. महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज ता.13 एप्रिल रोजी वणीत सभा आहे. चंद्रपूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी म .रा. उपमुख्यमंत्री फडणवीस हे सभा घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची आज सायंकाळी ५ वाजता वणी येथील शासकीय मैदान येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. चंद्रपूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेसाठी पाण्याचा टाकीजवळ जय्यत तयारी केली आहे. यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून प्रशासनाचेही याकडे लक्ष लागले आहे. विशेष या सभेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री काय बोलतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

पहिल्यांदाच मंत्री विरुद्ध आमदार अशी लढत…..
“मुनगंटीवार विरुद्ध आमदार प्रतिभा धानोरकर, अशी सरळ लढत होणार आहे. येथे पहिल्यांदाच मंत्री विरुद्ध आमदार अशी लढत होत आहे. सुधीर मुनगंटीवार व प्रतिभा धानोरकर या दोन्ही उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून महायुती व महाविकास आघाडीचे नेते प्रचाराला लागले आहेत. यापूर्वी या लोकसभा मतदार संघात मंत्री विरुद्ध आमदार, अशी लढत झालेली नाही. “

