अजय कंडेवार,वणी:- लोकसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले असतांना वेगवेगळ्या व्यूहरचना आखण्याचा व अनेकांच्या नियुक्त्या करून पक्ष बांधणीवर जोरकसपणे प्रयत्न चालविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुक्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.Raju Bhau again chose a “Dhanya Tiger” in Wani….

पक्षाची मोट बांधण्याचा दृढ दृष्टिकोन ठेवीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वणी तालुका उपाध्यक्ष पदी राकेश शंकावार तर मारेगाव तालुका महिला अध्यक्ष उज्वला चंदनखेडे यांचेकडे पदभार सोपविण्यात आला.या नियुक्तीचे पत्र मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच उंबरकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राकेश शंकावार आणि उज्वला चंदनखेडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या काळात नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे यात तिळमात्र शंका नाही.

यावेळी मनसे वाहतूक सेना इर्शाद शेख,संतोष रोगे,गजानन भालेकर ,धनंजय त्रिंबके,अर्चना बोदाडकर ,अंजुम शेख,अरुणा थेरे,प्रिया लभाणे ,वैशाली तायडे, म.न.से. तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार ,रुपेश ढोके ,गजानन मिलमिले,शिवराज पेचे ,चांद बहादे ,संतोष चिटलावार, तृषाल गब्रानी ,नयन बोबडे पाटील,मनिष जुनगरे ,सचिन येलगंधेवार, कपिल ठाकरे, हरीश कामारकर ,राकेश श्रीमनवार,संध्या पारखी, मयूर गेडाम,गुड्डू वैद्य ,गीतेश वैद्य व शुभम भोयर हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

