अजय कंडेवार,Wani : चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी वणीच्या शासकीय मैदानात 13 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता प्रचार सभा पार पडली. यावेळी राहुल गांधींवर टिकास्त्र करतांना म्हणाले की,एकीकडे नरेंद्र मोदींचे ‘पावरफुल इंजिन’ आहे. या ‘इंजिन’ सोबत आमच्या सगळ्या बोग्या आहेत. दुसरीकडे राहुल गांधी यांचा गाडीत सर्वच ‘इंजिन’ आहे. त्यामुळे कोण पंतप्रधान होणार हीच शर्यत सुरू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एक ‘ड्रायव्हर’च ‘इंजिन’मध्ये बसू शकतो. इतर कोणीही ‘इंजिन’मध्ये बसू शकत नाही. त्यामुळे यांच्या ‘इंजिन’मध्ये समाजातील कुठल्याही व्यक्तीला बसायची जागाच नाही. त्यांचे ‘इंजिन’ भरकटलेले आहे. त्यामुळे चंद्रपूर -वणी – आर्णी लोकसभेचे उमेदवार सुधीर भाऊना मतदारांनी भरघोस मतांनी निवडून आणून आता विकासाचे ‘इंजिन’ असलेल्या रेल्वेत बसण्याचे आवाहन,फडणवीस यांनी केले.
फडणविसांनी विकास कामांचा पाढा वाचला….
मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबीरेषेच्या बाहेर काढत मोठे परिवर्तन केलं. 20 कोटी लोकांना पक्की घर दिलीत. 11 कोटी लोकांनी शौचालय आणि 50 कोटी लोकांना घरात पिण्याचे शुद्ध पाणी या सरकारने दिले. असे अनेक विकासकामे आपल्याला सांगता येतील. त्यामुळे आगामी काळात पंतप्रधानांच्या नेतृत्वातील विकसित भारत आपल्या बघायचा आहे. त्यामुळे देशाच्या या विकासकामात आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वासाठी पुन्हा त्यांच्या मागे सक्षमपणे आणि पूर्ण ताकतीने उभे राहण्याचे आवाहन देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना केले आहे.
🟢सुधीर भाऊ वणी मतदार संघातील प्रश्न सोडवतील – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची ताकद असेल तर ती फक्त सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यातच आहे. आपण सर्वांनी झोकून देऊन सुधीरभाऊंना लोकसभा निवडणुकीत लाखो मतांनी विजयी करून त्यांना संसदेत पाठविले तरच केंद्रातील निधी आपल्या जिल्ह्यात आणि वणी विधानसभा मतदार संघाला मिळेल आणि आपल्या क्षेत्राचा विकास होईल अशी भावना आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी बोलून दाखविली
.
● विकासासाठी एकच पर्याय म्हणजे सुधीर भाऊच, सुधीर भाऊंसाठी मनसे खंबीरपणे प्रचार करून निवडूनही आणणार –मनसे नेते राजू उंबरकर .
“आजवर आम्ही अनेक नेते बघितले आहेत. शब्द देतात आणि वेळ आली की विसरून जातात. पण आपले सुधीरभाऊ मुनगंटीवार इथे अपवाद ठरतात. आम्ही जेव्हा-जेव्हा त्यांच्याकडे विषय ठेवला तेव्हा-तेव्हा त्यांनी दिला शब्द केला पूर्ण या उक्तीप्रमाणे सर्व प्रश्न आणि अडचणी मार्गी लावल्या आहेत. त्यांच्याकडे समस्या गेली कि त्यावर शंभर टक्के इलाज असतो. असा एक हि प्रश्न नसेल की जो सुधीर भाऊंनी सोडविला नसेल. त्यामुळे लोकसभेत आपल्या हक्काचा उमेदवार निवडून पाठविणे गरचेचे आहे आणि विकासासाठी एकच पर्याय म्हणजे सुधीर भाऊच, सुधीर भाऊंसाठी मनसे खंबीरपणे प्रचार करून निवडूनही आणणारअसे प्रतिपादन मनसे नेते राजू उंबरकर “
या प्रचार सभेत मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रपूर – वणी आर्णी चे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. संदीप धूर्वे, आ. अशोक उईके, भाजप महिला आघाडी अध्यक्ष चित्रा वाघ, भाजप महिला आघाडी सरचिटणीस अलका आत्राम, मनसे नेते राजू उंबरकर, तारेंद्र बोर्डे, रवी बेलुरकर, संजय पिंपळशेंडे, विजय पिदूरकर, विजय चोरडिया भाजप, शिवसेना मनसे व मित्र पक्षाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते