Ajay,Wani :- महसूल विभागाच्या ‘महाराजस्व समाधान शिबिर’ कार्यक्रमाची सुरुवात होण्यापूर्वीच त्याच्या प्रसिद्धीवरून वणीत राजकारण पेटले आहे. कार्यक्रमाच्या अधिकृत बॅनर स्थानिक मंत्री व आमदाराचा फोटो झळकला, मात्र स्थानिक खासदाराला पूर्णपणे डावलण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने प्रशासनावर केला.शासनाचा कार्यक्रम असेल तर सर्व लोकप्रतिनिधींना समान स्थान मिळाले पाहिजे. एका लोकप्रतिनिधीला पुढे करून दुसऱ्याला मागे ठेवण्याचा प्रयत्न का असा सवाल शासकीय कार्यक्रमाच्या नावाखाली राजकीय प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.
या प्रकरणी वणी काँग्रेसचे पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देत प्रसिद्धी साहित्य तयार करताना कोणते निकष वापरण्यात आले, याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे. स्थानिक मंत्र्यांचा आमदाराचा फोटो असेल तर स्थानिक खासदाराचा का नसावा शासनाची प्रसिद्धी की राजकीय प्रसिद्धी असा थेट प्रश्न उपस्थित आहे.
यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांचे नावही पत्रिकेत गायब…..
“महाराजस्व समाधान शिबिराच्या पत्रिकेत खासदाराचा फोटो नाही, तर यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांचे नावही नाही. हा केवळ योगायोग आहे की त्यामागे काही वेगळे राजकारण दडलं आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.”


