Thursday, May 28, 2026
HomeBreakingजनतेसाठी अजूनही धावणारा नेता; विकासासाठी बोदकुरवार पुन्हा मुंबईत.....

जनतेसाठी अजूनही धावणारा नेता; विकासासाठी बोदकुरवार पुन्हा मुंबईत…..

Ajay Kandewar,Wani:- वणी शहराच्या विकासाचा विषय आला की आजही माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे तितक्याच आक्रमकपणे पुढे सरसावत असल्याचे खरं चित्र पाहायला मिळत आहे.  शहरातील चेहरा मोहरा बदलविण्यासाठी त्यांनी थेट मुंबई गाठत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि वणीसाठी १० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली. जनतेच्या प्रश्नांसाठी अजूनही मंत्रालयाचे दरवाजे ठोठावणारा नेता म्हणून त्यांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

वणी शहरात रस्ते, नाले, सौंदर्यीकरण आणि मूलभूत सुविधांचे प्रस्ताव ठेवण्यात आला आहेत. मात्र या प्रश्नांवर केवळ राजकीय भाष्य न करता निधी मिळविण्यासाठी थेट शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका बोदकुरवार यांनी घेतल्याने सामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. “पद गेलं तरी जनतेसाठीची धडपड थांबली नाही,” अशी भावना अनेक नागरिकांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, माजी आमदार विकासासाठी आत्ताही एवढी धावपळ करत असताना शहरात कामाची तुलना चर्चिला जात आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व आणि केवळ आश्वासनांपुरते मर्यादित राहणारे नेतृत्व यातील फरक आता नागरिकांना स्पष्टपणे दिसत आहे. भाजपा हे केवळ आश्वासन पुरता राहत नाही तर जनतेच्या सेवांसाठी संजीवरेड्डी यांनी स्पष्ट दाखविला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page