Tuesday, May 26, 2026
HomeBreakingगावकऱ्यांनो.....कामचुकार फार्मसिस्ट,LHV व H.A वर लक्ष द्या...

गावकऱ्यांनो…..कामचुकार फार्मसिस्ट,LHV व H.A वर लक्ष द्या…

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील राजूर PHC मधील काही कामचुकार कर्मचाऱ्यांविरोधात आता गावकऱ्यांनीच “जनतेचा पहारा” उभा करण्याची वेळ आली आहे. मुख्यालयी न राहता शासनाचा पगार उचलणाऱ्यांना आता जाब विचारला गेला पाहिजे. गावातील आरोग्य सेवा वाऱ्यावर सोडून स्वतःच्या सोयी पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नागरिकांनी लक्ष ठेवणे गरजेचे बनले आहे.

राजूर परिसरातील नागरिकांनो, आता जागे व्हा!

आरोग्य केंद्रात वेळेवर कर्मचारी उपस्थित असतात का? मुख्यालयी वास्तव्यास आहेत का? की फक्त सही करून गायब होतात? यावर आता गावकऱ्यांनीच विशेष “वॉच” ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कामचुकार फार्मसिस्ट, L.H.V. आणि H.A. या तिन्ही कर्मचाऱ्यांविषयी सातत्याने तक्रारी समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. शासन जनतेच्या आरोग्यासाठी लाखो रुपये खर्च करते, मात्र काही कामचुकार कर्मचारी मुख्यालयी राहत नसतील तर तो थेट जनतेच्या पैशाचा अपव्यय ठरतो.

गावकऱ्यांना विशेष आवाहन…

जर संबंधित कर्मचारी मुख्यालयी राहत नसतील, वेळेवर उपस्थित नसतील किंवा वारंवार गैरहजर आढळत असतील तर त्यांचे Geo Tag फोटो, व्हिडिओ व माहिती पुराव्यासह “विदर्भ न्यूज पोर्टल”कडे पाठवा. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना आता उघडे पाडण्याची वेळ आली आहे.“फुकटचा पगार घेऊन जनतेला सेवा न देणाऱ्यांना थेट घरी बसवण्याची वेळ आली आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया आता राजूर परिसरातून उमटू लागली आहे.आरोग्य केंद्र हे जनतेसाठी असते; कर्मचाऱ्यांच्या मनमानीसाठी नाही.त्यामुळे आता प्रत्येक नागरिकाने सजग राहून राजूर PHC वर जनतेचा पहारा उभा करणे आवश्यक बनले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे कर्मचारी एक गेम खेळत असल्याची चर्चा सुरू आहे की मुख्यालयात कर्मचारी न राहता दो दिन मैं ….दो दिन तू ….दो दिन वो.... हे लवकरच पुराव्यानिशी समोर विदर्भ न्यूज आणणार आहे… ज्याला मुख्यालयाची ऑर्डर आहे तो मुख्यालयामध्ये का उपस्थित नाही ड्युट्या कशाला लावले जात आहे….?

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page