Wednesday, May 27, 2026
HomeBreakingते आठ सदस्य “राजीनामा मंजूर करा”चा 'जप' करताहेत..

ते आठ सदस्य “राजीनामा मंजूर करा”चा ‘जप’ करताहेत..

Ajay Kandewar,Wani : तालुक्यातील चिखलगाव ग्रा.पं. मध्ये गुरुवारी पार पडलेल्या ग्रामसभेत उपसरपंच सुनील कातकडे यांनी आठ सदस्यांच्या राजीनाम्याबाबत केलेले गंभीर आरोप आता संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरत आहेत. विशेष म्हणजे, ग्रामसभेत थेट आरोप झाल्यानंतरही राजीनामा दिलेल्या आठ सदस्यांपैकी एकही सदस्य समोर येऊन आरोपांचे खंडन करण्यास तयार नसल्याने संशय अधिकच गडद होताना दिसत आहे. यावर अद्यापही ते आठ सदस्य समोर येऊन “दूध का दूध पाणी का पाणी करायला तयार का नाही” असं जनतेच्या मनात सवाल उठलेला आहे.

उपसरपंच सुनील कातकडे यांनी ग्रामसभेत स्पष्ट शब्दांत “व्यक्तिगत विकासासाठीच हे राजीनामे देण्यात आले” असा आरोप केला होता. ग्रामसभेत हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित झाल्यानंतर गावकऱ्यांना अपेक्षा होती की संबंधित सदस्य समोर येऊन “दूध का दूध, पाणी का पाणी” करतील. मात्र, आरोपांना उत्तर देण्याऐवजी ते सदस्य सध्या फक्त “आमचा राजीनामा मंजूर करा” या एकाच घोषणेत व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.

उपसरपंच यांचा आरोपांमध्ये तथ्य नसेल तर संबंधित सदस्यांनी ग्रामस्थांसमोर येऊन स्पष्ट भूमिका मांडण्यास अडचण काय…? नेमकं राजीनाम्यामागे काय शिजलं होतं…? कोणाच्या दबावाखाली निर्णय घेतला गेला का…? की उपसरपंचांनी ग्रामसभेत केलेल्या आरोपांमध्ये काहीतरी सत्य दडलं आहे…? असे अनेक प्रश्न आता ग्रामस्थ उघडपणे विचारू लागले आहेत.

दरम्यान, राजीनामा दिलेल्या सदस्यांकडून अद्यापही कोणतेही ठोस स्पष्टीकरण समोर आलेले नाही. उलट काही सदस्य केवळ निवेदनं,अर्ज आणि “राजीनामा मंजूर करा” अशाच कागदोपत्री हालचाली करण्यात व्यस्त असल्याची चर्चा गावात सुरू आहे. मात्र, ग्रामस्थांना आता कागदोपत्री हालचाली नव्हे तर सत्य हवे आहे.ग्रामसभेत उपसरपंचांनी केलेले आरोप जर खोटे असतील तर संबंधित सदस्यांनी पुढे येऊन जनतेसमोर भूमिका स्पष्ट करणे गरजेचे असल्याची भावना गावात व्यक्त होत आहे. अन्यथा, त्यांच्या शांततेमुळे संशय अधिकच बळावत असून आत काहीतरी शिजलं होतं म्हणूनच राजीनामे दिले का…?हा प्रश्न जनतेचा मनातल आहे यावर ते आठ सदस्य अनुत्तरित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page