Sunday, May 31, 2026
HomeBreaking Newsवणीत मायक्रोन स्टुडंट्स अकॅडमीचा वेगळा प्रयोग… 

वणीत मायक्रोन स्टुडंट्स अकॅडमीचा वेगळा प्रयोग… 

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील वणी येथील मायक्रोन स्टुडंट्स अकॅडमी सध्या शिक्षण क्षेत्रात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून, यामागे मुख्याध्यापिका शोभना यांचा वेगळा, नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन कारणीभूत ठरत आहे. कोणताही औपचारिक मुद्दा न मांडता, थेट विद्यार्थ्यांच्या घडणीवर लक्ष केंद्रीत करणारी अकॅडमीक कार्यपद्धती येथे राबविली जात आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पहिली मुख्याध्यापिका म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या शोभना यांनी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे बोलावून संवाद साधण्याची अनोखी पद्धत अवलंबली आहे. या संवादातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील सुप्त गुण, क्षमता आणि आवडी हळूहळू समोर येत असून, त्या माहितीस वर्गशिक्षकांपर्यंत पोहोचवून विकासाचा वेग वाढवला जात आहे.ही प्रक्रिया केवळ तपासणीपुरती मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक–विद्यार्थी समन्वयाचा एक मजबूत दुवा तयार केला जात आहे. त्यामुळे अकॅडमीमध्ये अभ्यास, मूल्यमापन आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रवाह आपोआप गतिमान होत आहे.विद्यार्थी घडावा, त्याचा आत्मविश्वास वाढावा आणि शिक्षण केवळ पुस्तकापुरते मर्यादित राहू नये, या विचारातून मुख्याध्यापिका शोभना यांची जिल्हाभरात वेगळी ओळख निर्माण होत आहे.

शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यावर “Class Wise” फोकस….

शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा वैयक्तिक, शैक्षणिक व मानसिक विकास होणे गरजेचे आहे, या उद्देशाने मुख्याध्यापिका शोभना यांनी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कॅबिनमध्ये बोलावून त्यांच्या अडचणी, अभ्यासातील त्रुटी, आवड-निवड, मानसिक स्थिती याबाबत सखोल संवाद साधला. केवळ औपचारिकता न ठेवता खरे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांमधील कमतरता व विशेष क्षमता शोधून काढण्यावर भर देण्यात आला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page